Download App

Crime : सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?

चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरातून सात वर्षीय बालक तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

  • Written By: Last Updated:

Nashik Crime : चांदवड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडनेर भैरव येथून एका सात वर्षीय बालकाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे. (Nashik Crime) या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Nashik : लोकसभेला हवा फिरली विधानसभेला नाशिक भाजपच्या हातून जाणार?

नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे मोलमजुरी करणारे परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत यांच्या सात वर्षीय मुलाचे तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केलं होते. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता.

सात वर्षीय बालकाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतलं. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या करुन मृतदेह मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला.

Video : रशियात भूकंप! रिश्टर स्केलवर भूकंपाची 7 इतकी तीव्रता; थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल

बालकाचा मृतदेह सापडला

लहान मुलाला एका मंदिराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही समोर आला आहे. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आज बालकाचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

follow us