Download App

पाच दिवसांचे सर्च ऑपरेशन अन्…पोलिसांनी सांगितला जयसिंघानीच्या अटकेचा घटनाक्रम

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाच आणि धमकावल्याप्रकरणी बुकी अऩिल जयसिंघानीला गुजरातच्या बोर्डोलीत अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मुंबईचे डीसीपी बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात…

बुकी अनिल जयसिंघानी हा अहमदनगरमधील शिर्डीहून गुजरातमधील बोर्डोली इथं रवाना झाला होता. अऩिल जयसिंघानी तांत्रिक गोष्टींच्या मदतीने आपली ओळख लपवत होता. त्यामुळे त्याला अटक करणं हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान होतं, असं डीसीपी बालसिंग राजपूत यांनी सांगितलं आहे.

अनिल जयसिंघानी गुजरातला गेल्यानंतर त्याला अटक करण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांसह, गुजरात पोलिसांच्या मदतीने हे ऑपरेशन गुजरातमध्ये सुरु होतं. अनिल जयसिंघाला अटक करण्यासाठी अनेकवेळा सापळा रचण्यात आला. सलग 72 तास त्याने पोलिसांना गुंगारा दिल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.

‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित पवारांचा संतप्त सवाल

अखेर गोदरा परिसरात नाकाबंदी करुन अनिल जयसिंघाला मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याच्यासोबत वाहनचालक आणि त्याचा नातेवाईकही होता. अशा दोघांनाही पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

अटकेनंतर त्याच्याकडून मोबाईल, एक कार अशा वस्तू जप्त करण्यात आल्या असून हा आरोप आपलं लोकेशन लपवण्यात तरबेज असल्याची माहितीही डीसीपी राजपूत यांनी यावेळी दिलीय.

दरम्यान, अटक केल्यानंतर अऩिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपासानंतर जे निदर्शनास येईल ते आपल्या समोर येणार असल्याचं डीसीपी राजपूत यांनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us