Navneet Kaur Rana :
मागील वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी जाहीर हनुमान चालीसा पठण केल्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने खासदार नवनीत राणा यांना अटक करून तुरुंगात टाकलं होत. आज हनुमान जयंतीच्या दिवशी राणा यांच्याकडून जाहीर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आव्हान दिले.
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताने पाणी केले आणि हिंदू विचारधारा देशात निर्माण केली. मात्र उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मेहनतीवर माती टाकण्याचे काम केले.
तयारील लागा! लवकरचं बिगुल वाजणार; चंद्रकांत पाटलांचं पालिका निवडणुकांबाबत मोठं विधान
याशिवाय त्यांनी मागील वर्षी अटक झाल्यानंतर कारागृहातील अनुभव सांगितले. पण अनुभव सांगताना नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या की, “१४ दिवस आत ठेवल्यानंतर देखील मला एक महिना मला आतमध्ये ठेवण्याचा प्लॅन होता. माझी लहान मुलं देखील मला विचारत होती. आई तु काय केलं, तुला तुरूंगात का टाकले?
मी स्वत:ला विचारत होते की मी एवढी मोठी कोणती चुक केली की माझ्या महाराष्ट्राला अत्याचारी मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. अशीही टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. त्या पुढे म्हणाल्या की लॉकअप काय असते हे मला माहित नव्हते. कोर्टात गेली तेव्हा सांगितले बेल होणार नाही. पोलीस स्टेशनची डायरी बघितली तेव्हा मला कळले की मला देशद्रोह म्हणून कारागृहात टाकण्यात आले होते.
हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहाच…शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
याच कार्यक्रमातून नवनीत राणा यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आव्हान दिले आहे. त्या म्हणल्या की यापुढे महाराष्ट्रात जिथे महाविकास आघाडीची सभा होईल, तिथे आमचे कार्यकर्ते हनुमान चालिसा पठण करतील आणि ती जागा पवित्र करतील. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध राणा असं वाद रंगणार आहे.