तयारील लागा! लवकरचं बिगुल वाजणार; चंद्रकांत पाटलांचं पालिका निवडणुकांबाबत मोठं विधान

  • Written By: Published:
तयारील लागा! लवकरचं बिगुल वाजणार; चंद्रकांत पाटलांचं पालिका निवडणुकांबाबत मोठं विधान

Chandrakant Patil On State Corporation Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह महत्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजेल असे भाकित भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सध्या मुंबई, ठाणे, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून हाताळला जात आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील (Chadrakant Patil) यांनी रखडलेल्या निवडणुका कधी होणार याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे आता तयारीला लागण्याची वेळ आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

माजी मुख्यमंत्र्यांनी असे आरोप करणं हे दुर्दैव; तावडेंनी व्यक्त केली खंत

चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिका निवडणुकांविषयी महत्त्वपूर्ण भाकीत केले आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुका या ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात, असे पाटील यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, असे ते म्हणाले.

हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहाच…शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

या ठिकाणच्या निवडणुका प्रलंबित
राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर आणि नवी मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सध्या येथील कारभार प्रशासकांच्या हाती आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरुन सध्या महानगरपालिका निवडणुकांचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. यासंबंधीचे कायदेशीर समस्या मे महिन्यापर्यंत निकालात निघू शकतात. सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी महानगरपालिका निवडणुकांच्या प्रकरणाबाबत निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube