माजी मुख्यमंत्र्यांनी असे आरोप करणं हे दुर्दैव; तावडेंनी व्यक्त केली खंत

BJP Leader Vinod Tawade : भारतीय जनता पक्षाचा आज 43 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हे नागपूरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हे मनातून पक्क ठाऊक आहे की, भाजपा हा सत्तेसाठी नाही सत्ताही समाज परिवर्तनासाठी साधन आहे. हे साध्य नाहीये आणि हे समाज परिवर्तन करण्याचं काम गतीने होण्यासाठी भाजप तत्परतेने काम करते, असे ते म्हणाल आहेत.
भारतीय जनता पक्षाने या देशातल्या घराणेशाही च्या राजकारणाला फुलस्टॉप दिला आहे. घराणेशाही कडून येणाऱ्या हुकूमशाहीला फुलस्टॉप दिला आहे. राजकारणामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे, मात्र गेल्या नऊ वर्षांमध्ये केंद्रातल्या सरकारवर कुठलेही आरोप नाही. त्यामुळे भ्रष्टाचार विहिरीत सत्ता ही देता येते हे भाजपने सिद्ध केले आहे, असे तावडेंनी सांगितले आहे.
हिंमत असेल तर निवडणुकीला उभे राहाच…शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज
तरीही विरोधकांचं सातत्याने भाजपला विरोध करणं सुरू असतं आणि हे आपल्या घराणेशाच्या पक्षाच्या आधारे सुरू आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा मनाशी प्रतिज्ञा करतो आहे की, भारत मातेला विश्व गौरवाच्या शीर्ष स्थानी पोहोचवण्यासाठी अपार कष्ट करेल आणि जन्मसामान्यांच्या विकासासाठी काम करेल, असे तावडे म्हणाले आहेत.
Shrigonda Market Committee : बाजार समिती निवडणूक भाजप-काँग्रेस एकत्र लढवणार
यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणावर देखील भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री आरोप करतात हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी परंपरा आहे. मी विरोधी पक्षनेते असताना सत्ताधारी पक्षावर प्रचंड टीका केली होती. मात्र नंतर सोबत जेवण केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे. इतर राज्यापेक्षा आपल्या राज्यातील राजकारण वेगळं आहे, असे तावडेंनी सांगितले आहे.