Shrigonda Market Committee : बाजार समिती निवडणूक भाजप-काँग्रेस एकत्र लढवणार
श्रीगोंदा : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांना स्थगिती मिळाही होती. मात्र, आता बाजार समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. ग्रामीण राजकारणाचं केंद्र असलेल्या या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांचा कस लागणार आहे. या निवडणुकांत अनेक राजकीय समीकरण पाहायला मिळत असतात. राज्यात आणि केंद्रात भाजप-कॉंग्रेस हे एकमेकांचे विरोधक आहेत. मात्र, श्रीगोंदा बाजार समितीत भाजप आणि कॉंग्रेस एकत्र निवडणूक लढणार असल्याचं चित्र आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी केला याबाबतची माहिती दिली आहे.
श्रीगोंदा बाजार बाजार समितीच्या (Shrigonda Bazar Market Committee) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागवडे- पाचपुते -बाबासाहेब भोस यांनी या निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढवण्याची घोषणा श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
राजेंद्र नागवडे यांनी या पत्रकार परिषदेत बोलतांना सांगिलतं की, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आर्थिक फायदा होईल, यासाठी याकडे लक्ष देत तालुक्यात असलेल्या सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवत त्यांचा कारभार गतिमान व स्वच्छ उत्तम पद्धतीने चालू ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला. राजकारण बाजूला ठेवून पक्ष विरहित बाजार बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न होता. मात्र, नुकत्याच झालेल्या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत काही विघ्न संतोषी मंडळींनी आमचेच उमेदवार पाडण्याचा प्रयत्न करून गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप नागवडेयांनी केला. दरम्यान, आता आमदार पाचपुते यांचे बरोबर एकत्रित येऊन पॅनल करत असल्याची त्यांनी सांगिलत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज गतिमान करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन कोणत्याही परिस्थितीत आम्ही एक संघ राहून निवडणूक जिंकणार आहोत, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
Ghulam Nabi Azad : काँग्रेस रिमोट कंट्रोलने चालवली जातेय, राहुल गांधी काँग्रेसचे कॅप्टन
बाजार समिती ही शेतकऱ्यांचा आत्मा आहे. स्वर्गीय शिवाजीराव नागवडे बापू व आ बबनराव पाचपुते यांनी नेहमीच या संस्थेला अधिक बळ देण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या व शेतकऱ्यांच्या उज्वल भविष्यासाठी नागवडे पाचपुते भोस एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मनात कोणतीही शंका न येता आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे व बाबासाहेब भोस यांच्या समर्थ नेतृत्वाखाली बाजार समिती निवडणुकीत सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प यावेळी आ.पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप पाचपुते यांनी केला.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, वैभव पाचपुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळेस परिषदेस जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, अरुणराव पाचपुते, प्रशांत ओगले, सुभाष शिंदे, धर्मनाथ काकडे, संदीप नागवडे, मिलिंद दरेकर ,प्रशांत दरेकर, उत्तमराव अधोरे, श्रीनिवास नाईक, योगेश भोईटे, लक्ष्मणराव भोईटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.