भीषण अपघात! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली

नंदुरबार जिल्ह्यमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे

News Photo   2025 11 09T172007.131

News Photo 2025 11 09T172007.131

विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. (Accident) या बसमध्ये अंदाजे 20 ते 30 विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा -मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात हा अपघात झाला आहे, बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बस दीडशे फूट खोल दरीमध्ये कोसळल्यानं पूर्णपणे डॅमेज झाली आहे. या अपघातामध्ये एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, या अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे, विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली आहे. अक्कलकुवा- मोलगीला जोडणाऱ्या देवगोई घाट परिसरात हा अपघात झाला आहे.

बसमध्ये दबल्याने एका विद्यार्थ्याचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीनं बचाव कार्याला सुरुवात झाली असून, अपघातामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Exit mobile version