Download App

Kolhapur Accident : कोल्हापुरात भीषण अपघात, कंटेनरची 7 वाहनांना धडक

Kolhapur Accident : कोल्हापूरमधून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, कोल्हापुरच्या निपाणी (Nipani) जवळील तवंदी घाटात भीषण

  • Written By: Last Updated:

Kolhapur Accident : कोल्हापूरमधून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, कोल्हापुरच्या निपाणी (Nipani) जवळील तवंदी घाटात भीषण अपघात झाले आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, बेळगावहून कोल्हापूरला निघालेल्या कंटेनरने 7 वाहनांना धडक दिल्याने अपघात घडला.

चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यानं ही दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेमध्ये 3 जण जागीच ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर निपाणी मधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटेनरने तीन कार, दोन लॉरी, एक कंटेनर आणि अनेक दुचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आणि कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे आज सकाळी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघतात 5 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहे.

सरकारचा मोठा निर्णय, 16 सप्टेंबर रोजी सह्याद्री वाहिनीवर मराठवाडा मुक्तीसंग्रामाची संघर्षागाथा!

जखमींवर धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहे. माहितीनुसार, वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून सर्व मंडळी घरी येत असताना भरधाव पिकपने या वाहनाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.

आमची सरकार आणा, जुनी पेन्शन योजना लागू करतो, उद्धव ठाकरेंची कर्मचाऱ्यांना ग्वाही

follow us