Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. (Sambhajinagar) गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असतांना एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगर एन-6 भागातील संभाजी कॉलनीतील घडली आहे.
मृतकाचे नाव प्रमोद पाडसवान असं असून त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाव निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं?
पाडसवान यांच्या घराच्या समोरच असलेला सिडकोचा प्लॉट त्यांनी काही वर्षांपूर्वी विकत घेतला. गणेश मंडळाचा उत्सव पाडसवान यांच्या याच प्लॉटवर साजरा करण्यात येतो. या गणेश मंडळाचे अध्यक्ष निमोने असल्याने पाडसवान यांना त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी निमोने कुटुंब नेहमी खोडा घालायचा. त्यांनी त्याच प्लॉटवर मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी शेड टाकले होते. सिडकोकडे अतिक्रमणाची रीतसर तक्रार केल्यावर एप्रिल महिन्यात त्यांनी हे अतिक्रमण हटवले होते.
१५ ते २० दिवसांपूर्वी पुन्हा त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले. त्यातून पाडसवान आणि निमोने कुटुंबांत वाद झाला, गणेशोत्सव जवळ येत असल्याने त्यांच्यातील वाद वाढत होता. पाडसवान कुटूंबाने बांधकामासाठी आणलेले साहित्य देखील त्या ठिकाणी पडलेले होते. पण साहित्य बाजूला करून घ्या आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा असं म्हणून निमोने त्यांच्यावर दबाव टाकायचे. याच रागातून आणि निमोने कुटुंबाचे राजकीय तगडे सबंध आणि त्यातून वाढलेल्या दादागिरीनंतर त्यांनी पाडसवान कुटूंबावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये प्रमोद पाडसवान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाचे ढोल ठेवण्यावरून वाद झाला असतांना एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यात जमीन मालकाच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. #ChhatrapatiSambhajinagar #Ganeshotsav2025 pic.twitter.com/NVvIiNBA7N
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) August 23, 2025