Youth Attempts Suicide In Beed : बीडमध्ये आज 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बीडमध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आलं. (Beed) बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हा मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह प्रमुख अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
गृह विभागाचं मोठ पाऊल; बीडच्या जिजाऊ माँसाहेब मल्टिस्टेटवर कारवाई, अध्यक्षांना केली अटक
पोलीस दलाच्या पथसंचालनाचे निरीक्षण दत्ता भरणे यांनी केले. यावेळी दत्ता भरणे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा संदेश दिला. कार्यक्रम आटोपून भरणे यांचा ताफा शासकीय विश्रामगृहाकडे जाताना एका तरूणाने त्यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करून बीडच्या शासकीय विश्रामगृहाकडे मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा जात असताना एका तरुणाने ताफ्यासमोर एका तरूणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नितीन मुजमुले असे या तरुणाचे नाव असून बीड नगरपालिका अंतर्गत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना बडतर्फ करा अशी मागणी या तरूणाने केली आहे.
अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पाडून दत्तात्रय भरणे शासकीय विश्रामगृहाकडे निघाले होते. त्यांचा ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यंत पोहोचताच या तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने अचानक गोंधळ उडाला आहे.
धुळ्यातही आत्मदहनाचा प्रयत्न
धुळ्यात देखील प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी वावड्या पाटील नामक गोरक्षकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. शिरपूर येथील गोरक्षक असलेल्या वावड्या पाटील नामक गोरक्षकाने पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.