Aaditya Thackeray : टँकर चालकांनी राज्य सरकारच्या हस्तक्षेपानंतर पाच दिवसांपासून सुरु असणारा संप मागे घेण्याची घोषणा केली असल्याने आजपासून पुन्हा एकदा मुंबईत टँकर सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी मुंबईकरांचा घसा कुणी कोरडा पाडला आणि त्याचे उत्तर सरकरा देणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या मोर्चाच्या हाकेनंतर आज शेवटी मुंबईच्या आयुक्तांनी टॅंकर असोसिएशनला हमी दिली आणि संप मागे घेतला गेला, पण तरीही काही प्रश्न उरतातच! वारंवार टॅंकर असोसिएशन कडून दिल्या गेलेल्या इशाऱ्यांनंतरही व गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या संपानंतरही आजवर मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचं नियंत्रण असलेली मुंबई महानगरपालिका गप्प का होती? महावीर जयंती, हनुमान जयंती आणि आंबेडकर जयंतीसारख्या सणांच्या दिवशी मुंबईकरांना मुद्दाम त्रास देण्यासाठीच ह्या संपाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं का? संप समाप्तीची घोषणा मुंबई महानगरपालिका मुख्यालयातून होण्याऐवजी भाजपा आमदाराच्या मंचावरुन होणं तर जास्त शंका निर्माण करणारं नाहीये का?
जणू काही क्रेडिट घेण्यासाठी मुद्दाम संप 2 दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं गेलं आणि मग श्रेय घेण्यासाठी नाटक केलं? मुंबईकरांनी भाजपाचा हा डाव आणि मुंबईबद्दल असलेला आकस वेळीच ओळखावा. मुंबईकरांचं भलं करण्याऐवजी मुंबईकरांना वेठीस धरुन स्वतःचं राजकारण खेळण्याची ह्यांची वृत्ती मुंबई आणि महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. असं आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दिलेल्या मोर्चाच्या हाकेनंतर आज शेवटी मुंबईच्या आयुक्तांनी टॅंकर असोसिएशनला हमी दिली आणि संप मागे घेतला गेला, पण तरीही काही प्रश्न उरतातच!
वारंवार टॅंकर असोसिएशन कडून दिल्या गेलेल्या इशाऱ्यांनंतरही व गेल्या आठवड्यात सुरु झालेल्या…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 14, 2025
गेल्या पाच दिवसांपासून टँकर चालकांचा संप मुंबईमध्ये सुरू होता. टँकर चालकांच्या विविध मागण्यांसाठी सरकारने लक्ष घालावं यासाठी काही दिवसांपूर्वी टँकर चालकांनी सरकारला निवेदन दिले होते. मुंबईकरांचे हाल होतील हे माहिती असूनही सरकारनं टँकर चालकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यामुळेच ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई मुंबईकरांना भासली.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पाण्याचा तुटवडा टँकर चालकांच्या संपामुळे निर्माण होऊ शकतो याचं गांभीर्य सरकारी बाबूंना का आले नाही ? हा देखील संशोधनाचा भाग आहे. मात्र सोयीनुसार मुंबई आमची म्हणणाऱ्या सरकारमधील नेत्यांनी सोयीनुसारच टँकर चालकांच्या संपाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मुंबईकरांचे हाल सुरू झाले. अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
रणजित कासलेंना आणखी एक दणका, एसपी नवनीत कावतांची महत्वाची माहिती