Download App

सुई-दोऱ्यापासून जेवण्याचा भांड्यांपर्यंत… माऊलींच्या पालखीची तयारी कुठे पर्यंत आली?

Dnyaneshwar Mauli Palakhi :  आषाढीवारीसाठीची वारकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. दरवर्षी वारकरी मोठ्या उत्साहाने वारीत सहभागी होत असतात. त्यानिमित्ताने आळंदी व देहूच्या संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 11 जून रोजी आळंदी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने संस्थानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

माऊलींच्या पालखीसोबत मंदीर समितीचे 300 लोक असणार आहे. रथासोबत माऊलींच्या आरतीचे सामान, वस्त्र, दागिने याची सर्व तयारी झाली आहे. वारीमध्ये लागणआऱ्या सुई- दोऱ्यापासून ते तंबूची आणि जेवणाची संपूर्ण तयारी झाली आहे. यासंदर्भात आळंदी देवस्थानचे श्रीकांत लवांदे यांनी माहिती दिली आहे. गेल्या एक ते दीड महिन्यापासून वारीसाठीची तयारी सुरु झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

देवाची भांडी, देवाचे वस्त्र, किराणा सामान, जेवणाची भांडी, स्टेशनरी, दक्षिणापेटी  हे सर्व साहित्य आम्ही इथे काढून ठेवल्याचे लवांदे यांनी सांगितले. वारीमध्ये लाखो लोक सहभागी होतात. त्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

तसेच माऊलींच्या प्रस्थानाविषयी विश्वस्त योगेश देसाई यांनीदेखील माहिती दिली आहे. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाला उशीर होतो. यावेळी मात्र आम्ही तो उशीर टाळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतमध्ये जे धारकीव व वारकरी येतात त्यांची संख्या मर्यादित करुन 75 केली आहे. त्यामुळे माऊलींच्या पालखीचे प्रस्थान वेळेत होईल व वारकऱ्यांना दुसऱ्या दिवशी निघण्यासाठी वेळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

सर्वसामान्यांना दिलासा! कर्जाचे हप्ते वाढणार नाहीत, RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’

दरम्यान, यावेळी आळंदीत हजारो वारकरी येतात. त्यामुळे यावर्षी आळंदीत खास व्यवस्था करण्यात आली आहे. आळंदी शहरात सहा ठिकाणी स्क्रीन, ९५ सीसीटीव्ही कॅमेरे, कर्मचारी, स्वयंसेवक २४ तास स्वच्छता करणार, महाद्वार, गाभारा मंदिरात पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags

follow us