Download App

मुस्लिम विरोधी वक्तव्यावरून अबू आझमी आक्रमक; नितेश राणेंवर कारवाई करण्याची मागणी

Abu Azmi यांच्या नेतृत्वामध्ये पहेलगाम आतंकवादी हल्ल्यानंतर मुस्लिम विरोधी वक्तव्यांविरोधात आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.

Abu Azmi aggressive over anti-Muslim statement; Demand action against Nitesh Rane: पहेलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजा विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य करून सामाजिक वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी समाजवादी पार्टी तर्फे आज मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आसिम आजमी यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले.

>न्यायमूर्ती बी.आर. गवई होणार देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली मंजुरी

यावेळी बोलतांना अबू आजमी म्हणाले की, पहेलगाम येथे झालेला आतंकवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो परंतु अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री हे सातत्याने मुस्लिम विरोधी द्वेषाचे वक्तव्य करून दोन धर्मामध्ये वाद निर्माण करीत आहे. तसेच दादर व मुंबई मधील इतर विभागात मुस्लिम समाजाचे फेरीवाल्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही मंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासारखे मुस्लिम समाजा विरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत आहे.

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या जमिनींची चौकशी; SIT स्थापन, अंजली दमानियांच्या मागणीची दखल

यामागणीसह सर्वोच्च न्यायालयाने २०२३ च्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दिलेल्या निकालानुसार दोषी व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, धर्मनिरपेक्ष संबंधांची पर्वा न करता द्वेष पसरवणाऱ्या, हिंसाचाराला प्रवृत्त करणाऱ्या, जनतेला धमक्या देणाऱ्या, आर्थिक बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या, धर्म, जात, प्रदेश, भाषा या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सर्व संघटनांवर बंदी घालण्यात यावी. प्रत्येक नागरिकाच्या व्यवसाय, व्यापार, धंदा करण्याच्या मूलभूत अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे राज्याने आपल्या घटनात्मक कर्तव्यानुसार संरक्षण करण्यात यावे, प्रत्येक नागरिकाच्या श्रद्धा आणि विश्वासाच्या स्वातंत्र्याचे राज्याने संरक्षण करण्यात यावे.

गोरेंची अरेरावी थांबेना! तुझी अवस्था तुषार खरातसारखी करेन म्हणत मंत्री जयकुमार गोरेंची सामाजिक कार्यकर्त्यास धमकी

भारतीय संविधानाच्या अनुच्छेदानुसार राज्यात शांतता आणि न्यायाचे वातावरण असावे. शांतता, कायदा आणि संविधानाच्या शत्रूंना कायद्याच्या कचाट्यात आणून आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर आणि कठोर शिक्षा देऊन कायद्याचे राज्य आणि न्याय अत्यंत पारदर्शकपणे प्रस्थापित करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाचे निवेदन समाजवादी पार्टी च्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फळसंकर यांना दिले. यावेळी समाजवादी पार्टी चे मेराज सिद्दीकी, युसूफ अब्रानी, राहुल गायकवाड, कुबेर मौर्या, सईद खान, झेबा मलिक यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us