Nashik Agniveer Death: नाशिकच्या (Nashik) आर्टिलरी सेंटरमध्ये (Artillery Center) भीषण अपघात झाला आहे. आर्टिलरी सेंटरमध्ये प्रशिक्षणादरम्यान तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाला आणि यात दोन अग्निवीर (Agniveer) जवानांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, या अपघातात गोहिल सिंग आणि सैफत शीट यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक आर्टिलरी सेंटरमध्ये नियमित प्रशिक्षण सत्रा दरम्यान जवान फायर सराव करत असताना हा अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तोफ लोड करत असताना अचानक शेल फुटला, त्यामुळे दोन्ही जवान जखमी झाले. त्यांना तातडीने सैनिक रुग्णालयात नेण्यात आले, तेथे उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
तर दुसरीकडे देवलाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना रात्री 12 च्या सुमारास घडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत हे दोन्ही अग्निवीर गेल्या वर्षी नाशिकरोडवर असलेल्या आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल झाले होते.
STORY | Two Agniveers killed as shell explodes during firing practice in #Nashik
READ: https://t.co/lPzSFYotFb pic.twitter.com/lBdQhzJcyQ
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2024
तपासाचे आदेश
तर भारतीय लष्कराकडून एक निवेदनही जारी करण्यात आले आहे. प्रशिक्षण सत्रादरम्यान तोफेचा गोळा लोड करत असताना ब्लास्ट झाल्याने दोन अग्निवीरांचा मृत्यू दुःखद असल्याचे लष्कराने म्हटले आहे. दोन्ही अग्निवीर हैदराबादहून नाशिकमधील देवळाली येथील आर्टिलरी स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आले होते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी लष्कराने घटनेच्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.