पुढचे दहा तास महत्वाचे; 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघराजा बरसणार; हवामान विभागाचा अंदाज काय?

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

News Photo   2026 07 15T172205.809

पुढचे दहा तास महत्वाचे; 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर मेघराजा बरसणार; हवामान विभागाचा अंदाज काय?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिली आहे, आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाभावी पिकं सुकून चालली आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट सतावत आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हवामान विभागाकडून तब्बल 15 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, पुढील दहा तासांमध्ये या राज्यांत पावसाचा जोर वाढणार आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, या काळात 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या काळात मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहनही भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसाच्या विलंबामुळं शेतकरी संकटात; मराठवाड्यात कुठं किती पाऊस अन् आजच चित्र काय?

उत्तर भारत आणि पूर्व भारतात पुढील दहा तासांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, परंतु आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

वीस जुलैपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, पुढील काही तासांमध्ये मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. परंतु वीस तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version