Navnath Waghmare : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी जाळून गाडीचे नुकसान करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विश्वंभर तिरुखे असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची स्कॉर्पिओ गाडी पार्किंगमध्ये उभी असताना अज्ञात आरोपीने ही गाडी जाळली होती.
शहरातील निलमनगर भागात ही घटना घडली होती.दरम्यान ही सर्व घटना पार्किंग मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला होता.दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही गाडी जरांगे समर्थक असलेल्या विश्वंभर तिरुखे याने जाळल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी आज तिरुखे याला अटक केली. नेमक्या कोणत्या कारणावरून तिरुखे याने वाघमारे (Navnath Waghmare) यांची गाडी जाळली याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. विश्वंभर तिरुखे हा कट्टर जरांगे समर्थक मानला जातो.
अँड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) दोन दिवसांपूर्वी जालन्यात येत असताना शहरातील नागेवाडी टोलनाक्याजवळ तिरुखे याने सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता.या घटनेनंतर देखील पोलिसांनी तिरुखे याला नजर कैदेत ठेवलं होतं.दरम्यान ज्या दिवशी सदावर्ते यांच्या गाडीवर तिरुखे याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी रात्री त्याने वाघमारे यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रपती भवनात ’12th फेल’ चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला राष्ट्रीय पुरस्कार
दरम्यान तिरुखे याला कदीम पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपीच्या अटकेनंतर वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.या घटनेचा कर्ता करविता जरांगे असून जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
10 किलो गहू – तांदूळ अन् 5 हजारांची मदत; पूरग्रस्त नागरिकांसाठी आमदार सुरेश धसांची मोठी घोषण