घायवळ गँगने ज्याला संपवायचा प्रयत्न केला त्याच्यावर मोक्का; वाचा नक्की काय घडलं?

याबाबत रोहित आखाडेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये तो संतोष धुमाळ गँगसोबत होता. त्यावेळी एका गुन्ह्यात त्याला अटक झाली होती.

Ghaywalll

Ghaywalll

कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा जुना साथीदार संतोष धुमाळ याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. धुमाळ याचा जुना साथीदार रोहित आखाडे (Pune) याच्या तक्रारीनंतर त्याच्यावर खंडणी व जीवे मारण्याची धमकी शिवाय धुमाळवर आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे 21 गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

याबाबत रोहित आखाडेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये तो संतोष धुमाळ गँगसोबत होता. त्यावेळी एका गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. पोलिसांना त्याने धुमाळबाबत काही माहिती दिली होती. याचा राग मनात ठेऊन धुमाळने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री व्हिडीओ कॉल करून आखाडेला धमकावले. तुझ्यामुळे मला अटक झाली, त्यामुळे 10 लाख दे नाहीतर, माझी गोळी खायची ताकद ठेवं, अशी धमकी दिली.

Video : मुख्यमंत्र्यांकडून गृहराज्यमंत्री कदमांना; क्लीन चीट, घायवळच्या शस्त्र परवान्याबद्दल मोठा खुलासा

पहिल्यांदा आखाडेने याकडे दुर्लक्ष केलं. पण 4 सप्टेंबरला धुमाळने पुन्हा फोन करून खंडणीची मागणी केली. नंतर त्याने साथीदारांसह कोथरुड भागात येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर रोहित आखाडेने तक्रार दाखल केली होती. संतोष धुमाळसह विपुल उत्तम माझिरे आणि सागर गवासने या साथीदारांवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. धुमाळ हा मुळशी तालुक्यातील असून तो सध्या कोथरुड भागात वास्तव्यास आहे.

तो निलेश घायवळचा जुना साथीदार आहे. पण जमिनीच्या वादातून बिनसल्यानंतर धुमाळने घायवळ गँग सोडली होती. 17 सप्टेंबरच्या रात्री घायवळ टोळीतील पाच जणांनी संतोष धुमाळवर हल्ल्याचा ट्रॅपही लावला होता. हल्ल्याच्या आधी त्यांनी चांदणी चौकात दारू प्यायली. नशेत कोथरुडच्या दिशेने जाताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. ज्याला धक्का बसला तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती होता. नशेतील गोंधळात त्यांनी प्रकाश धुमाळवर गोळीबार केला, तर दुसऱ्या एका तरूणावर कोयत्याने हल्ला केला.

Exit mobile version