Imran Khan Leave India : बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांनी भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडून जाण्याची नोटीस इम्रान खानला देण्यात आले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित आंदोलनात सहभागी झाल्याने भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी इम्रान खान विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्राराची दखल घेत इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी अभिनेता इम्रान खानला (Imran Khan) नोटीस बजावली आहे. त्याच्या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरुद्धच्या (Gyanesh Kumar) आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. इम्नान खानकडे अमेरिकेचं नागरिकत्व असल्याने त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Bollywood Actor Imran Khan asked to leave India days after protest against CEC Gyanesh Kumar: Report https://t.co/xPxRJuaLl0
— 🚨Indian Gems (@IndianGems_) October 15, 2026
10 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशाची राजधानी दिल्लीसह मुंबईत देखील आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांसह बॉलिवूड अभिनेता इम्नान खान देखील सहभागी झाल्याने त्याच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी इम्नान खानला नोटीस बजावली आहे.
