Download App

अहमदनगर : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाच्या भावाला बंदूक दाखवत मारहाण; भर रस्त्यावर थरार!

अहमदनगर : शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक विक्रम राठोड यांचे बंधू आदित्य राठोड यांना बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील कायनेटिक चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शहरात खुलेआम बंदुकी काढल्या जातायत, पोलीस प्रशासन करतंय काय? अशा शब्दात विक्रम राठोड यांनी संताप व्यक्त केला. (Aditya Rathod, brother of former Shiv Sena (Thackeray group) corporator Vikram Rathod, beaten up at gunpoint)

या प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य राठोड हे मंगळवारी आपल्या कुटुंबियांसमवेत नगर शहरातील कायनेटिक चौक परिसरातून जात होते, यावेळी एक टोळके त्या ठिकाणी आले. या टोळक्याने आदित्य यांना गाडीतून बाहेर काढले आणि त्यांच्या डोक्यावर थेट बंदूक लावली. बंदूकीचा धाक दाखवत त्यांनी आदित्य राठोड यांना जबर मारहाण केली.

‘लोकायुक्त विधेयक मंजूर करा अन्यथा माझा मार्ग…; अण्णांच्या अल्टिमेटमने सरकारला धडकी

दरम्यान विक्रम राठोड हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यांना फोनवरुन हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी काही कार्यकर्त्यांना आदित्य राठोड यांच्या मदतीसाठी पाठविले. याप्रकारानंतर विक्रम राठोड यांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले. नगर शहरात असे प्रकार खुलेआम होऊ लागले आहे. अशा घटनांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाहीआहे. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम बंदुकीचा धाक दाखवला जात असले तर यामध्ये पोलीस प्रशासन कोठेतरी कमी पडत आहे अशी खंत राठोड यांनी व्यक्त केली आहे.

लोकपाल विधेयक कधी मंजूर होणार? अण्णा हजारेंच्या भेटीनंतर मंत्री विखेंनी सांगितली डेडलाईन

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अगदी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहचला आहे. याशिवाय राज्याच्या विधानसभेतही याबाबत चर्चा झाली. शहरात आणि जिल्ह्यात काही केल्या गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसून येत नाही आहे. खून, दरोडा, हत्याकांड अशा घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातच पुन्हा एकदा धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे.

Tags

follow us