लोकपाल विधेयक कधी मंजूर होणार? अण्णा हजारेंच्या भेटीनंतर मंत्री विखेंनी सांगितली डेडलाईन
Radhakrushn Vikhe Patil meet Aanna Hajare : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil ) यांनी ज्येष्ठ समाजसेवक आणि लोकपाल आंदोलनाचे प्रणेते आण्णा हजारे (Aanna Hajare ) यांची त्यांच्या गावात राळेगण सिद्धीमध्ये भेट घेतली. यावेळी विखे आणि अण्णा यांच्यामध्ये लोकायुक्त कायदा संमत करण्याबाबत चर्चा झाली. अशी माहिती मंत्री विखे यांनी दिली. तसेच त्यांनी यावेळी लोकपाल विधेयक कधी मंजूर होणार? याची देखील माहिती दिली. (Radhakrushn Vikhe Patil meet Aanna Hajare for pass Lokpal bill )
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेने पारित केलं होतं. तर विधान परिषदेमध्ये ते सिलेक्ट कमिटीकडे गेलं होतं. त्या विधेयकावर अधिक चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. तिचा मी अध्यक्ष आहे. तसेच यात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आहेत. या संदर्भात दोन बैठका झाल्या. ते लवकरात लवकर मंजूर व्हावं तसेच इतर राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी कशी सुरू आहे? त्या राज्यांची दौरा करावा अशी देखील चर्चा झाली होती.त्यानंतर आण्णा हजारे यांनी देखील ते लवकर मंजूर करावं अशी मागणी केली. त्यावर आता हे विधेयक येत्या अधिवेशनामध्ये मंजूर केलं जाईल अशी माहिती यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
‘मग, अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून मोदींनी रोखले का?’ PM मोदींच्या टीकेवर राऊतांचा थेट सवाल
पुढे ते म्हणाले की, लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांचाही अंतर्भाव असावा अशी सुधारणा करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी तात्काळ समितीची बैठक बोलावली जाईल. समितीने मान्याता दिली तर वेळ आली तर त्यावर अध्यादेशही काढू. फडणवीसांनी या विधेयकावर प्रक्रियेला सुरू केली. ते मुख्यमंत्री असताना ते विधानसभेत पारित झालं मात्र विधान परिषदेमध्ये विरोधकांमुळे त्याला अडचणी आल्या. विरोधकांनी त्यावर अधिक चर्चेची मागणी केली.
तसेच फडणवीसांनी यासाठी सर्व पक्षाच्या गटनेत्यांच्या संमतीने ही समिती गठीत केली होती. आता या समितीचा अहवाल तयार होत आहे. तर अण्णांच्या मागणीला सरकार वेळ काढू पणा करत नाहीय. हे विधेयक येत्या अधिवेशनामध्ये मंजूर केलं जाईल अशी माहिती यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.