administration taken big step to convince citizens of the importance of saving water in Ahilyanagar : नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ चे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभागामार्फत देण्यात आली आहे. जलसंपदा पंधरवडा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात येईल.
१६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी,कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, १८ एप्रिल रोजी शेतकरी,पाणी वापर संस्था संवाद, १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी आणि २० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान रबविण्यात येणार आहे.
Video : आयएएस अधिकारी महेश झगडे आर. आर. आबांना रुग्णालयात का घेऊन गेले होते?, पहा खास मुलाखत
उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींचे २१ एप्रिल रोजी निरसन करण्यात येणार आहे. २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे, २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक, कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात येतील.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात तीन भिडू भूकंप घडवणार…; पुण्यातून फुंकणार रणशिंग
२४ एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, २५ एप्रिल रोजी विद्यापीठ, केव्हीके, सेवाभावी संस्था यांचे समवेत संवाद व कृती कार्यक्रम, २६ एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे, २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन (पूर,मालमत्तेचे रक्षण) करण्यात येईल.
महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे २८ एप्रिल रोजी महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे,अतिक्रमण निष्कासन ३१ मे पूर्वी करणे, २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र,कार्यशाळा आणि ३० एप्रिल २०२५ रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा,महिला मेळावा आणि समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.पंधरवड्यात नागरिकांना जलबचतीचे महत्व पटवून देण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.