Download App

पक्षांतर्गत भांडणे सोडविण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का ? ; अॅड. प्रकाश आंबेडकरांचा सवाल

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका घेणे हे फक्त निवडणूक आयोगाचे काम आहे. त्याचा त्यांना अधिकार आहे. या अधिकारांतर्गत पक्षातील भांडणे सोडविण्याचा अधिकार त्यांना आहे का,  असा सवाल उपस्थित करत या मुद्द्यावर जर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात अपील दाखल केले तर त्यांना न्याय मिळेल, असा दावा अॅड. आंबेडकर यांनी केला आहे.

या निर्णयामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. मात्र, तरीही त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत घेत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार अससल्याचे सांगितले. ठाकरे यांच्या या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीचे (VBA) संस्थापक अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले आहे.

हे सुद्धा वाचा : राऊतांनी ललकारले..! शिवसेनाभवन आमचे, शाखाही आमच्याच, शिवसैनिकही तिथेच बसतील..

                       उद्धवजी धनुष्यबाण जाऊ द्या; जगनमोहन रेड्डी कडे बघा आणि लढा!

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अॅड. आंबेडकर म्हणाले, की निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्यावर न्यायालयात जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. त्यांनी न्यायालयात जरूर अपील दाखल करावे. निवडणूक आयोगाने पक्ष चिन्ह किंवा पक्षाच्या भांडणात निर्णय देणे हे त्यांच्या अधिकारात येते का हा खरा मुद्दा आहे. निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. निवडणुका घेणे त्या कोणत्याही परिस्थितीत घेणे असा याचा अर्थ होतो. मात्र, या अधिकारांतर्गत पक्षातील भांडणे सोडविण्याचा अधिकार आयोगाला आहे का, या मुद्द्यावर जर उद्धव ठाकरे न्यायालयात गेले तर त्यांना नक्कीच न्याय मिळेले,असा विश्वास वाटतो.म्हणून त्यांनी या मुद्द्यावर न्यायालयात अपील दाखल करावे,असे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

Tags

follow us