Download App

मनसेचं खळ्ळखट्याक! अमित ठाकरेंची गाडी अडविल्याने फोडला समृद्धी हायवेवरील टोल नाका

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची गाडी अडविल्यामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी टोल नाकाच फोडला आहे. रात्री सुमारे अडीच वाजता समृद्धी महामर्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा टोल नाक्यावर मनसैनिकांचे खळ्ळखट्याक पाहायला मिळाले. या तोडफोडीत टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप या प्रकरणी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, पुन्हा असे झाल्यास पुन्हा तोडफोड करु असा इशाराही समर्थकांनी दिला असल्याची माहिती आहे. (After blocking Amit Thackeray’s car MNS workers broke Tola Naka on Samruddhi Highway)

मागील पाच दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर होते. धुळे, नंदुरबारचा दौरा संपवून शनिवारी ते अहमदनगरमध्ये होते. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. या दरम्यान, मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेल्या टोल नाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी अडवण्यात आली. सुमारे अर्धा तास त्यांचा ताफा टोल नाक्यावरच थांबला होता. यानंतर अमित ठाकरे यांना जबरदस्ती थांबवून ठेवले असल्याचा दावा करत नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह समर्थकांनी टोल नाक्याची तोडफोड केली.

Pankaja Munde : ‘पंकजांना भाजपमध्ये जास्त त्रास झाला तर’… भाऊ जानकरांचा निर्वाणीचा इशारा

या तोडफोडी दरम्यानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे. यात 10 ते 12 कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत हातात हॉकी स्टिक आणि लाठी घेत टोल नाक्याची तोड फोड करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, या तोडफोडीत टोल नाक्याचं मोठं नुकसान झालं आहे. ऑटोमॅटिक बुम बॅरिअर, टोल बुथच्या काचांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. अमित ठाकरे यांना अडविल्याचा निषेध म्हणून हा टोल नाका फोडला असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवाय पुन्हा असे झाल्यास पुन्हा तोडफोड करू असा इशाराही दिला आहे. यादरम्यान अमित ठाकरेंचा फास्ट टॅग ब्लॅक लिस्टेड करण्यात आले असल्याची माहिती आहे.

Tags

follow us