रामदास कदम यांचा गड मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये उद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे देखील सभा घेणार आहे. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी ट्विटद्वारे या सभेची माहिती देत टिझर पोस्ट केला आहे. शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!! महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा. असं लिहीत योगेश कदम यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.
शिवसेना निष्ठावंतांचा एल्गार!!
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड येथे शिवसैनिकांची भव्यदिव्य जाहीर सभा..
१९ मार्च २०२३ वेळ सायंकाळी ५ वाजता, गोळीबार मैदान, खेड.#Shivsena pic.twitter.com/y7BCnD577L— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) March 17, 2023
लाँगमार्च आंदोलन : Eknath Shinde शेतकरी, आदिवासींना काय म्हणाले…?
काही दिवसापूर्वी खेड मध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती. सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी रामदार कदम यांच्यावर मोठी टीका केली होती. सभेनंतर रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली होती, यावरुनही खेडचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाने लगावला आहे. आता त्याच मैदानावर एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नक्की काय बोलणार, हे पाहणं महत्वाचं आहे.