Download App

ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी लाल बावटा मैदानात; आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा

Agitation at Azad Maidan on June 12 for the demands of sugarcane workers and lawsuits : ऊसतोडणीच्या कामासाठी दिलेली उचल वसूल करण्यासाठी ऊसतोड कामगारांवर (Sugarcane Workers) होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं ऊसतोड कामगारांच्या मुजरीत घट झाली. या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांच्या रोजगारा नसल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र, साखर कारखानदारांच्या दबावाखाली शिंदे-फडणवीस सरकार पोलिस यंत्रणेमार्फत (Police) ऊसतोडणी मुकादमांवर गुन्हे दाखल करत आहे.

दरवर्षी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान लाखो ऊसतोड मजूर रोजगारासाठी स्थलांतरित होतात. आपलं कुटुंब आणि घरदार सोडून हे ऊसतोड कामगार उसाच्या शेतात काबाडकष्ट करतात. एक टन ऊस तोडल्यानंतर दोनशे रुपये त्यांच्या हातात पडतात. मात्र, उसतोडीच्या कामासाठी दिलेली उचल वसूल करण्यासाठी कामगारांवर गुन्हे दाखल केले जातात. या घटनेच्या निषेधार्थ आणि ऊसतोड कामगारांसोबत वारंवार होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ प्रणीत लालबावटा ऊसतोड कामगार, मुकादम आणि ट्रान्सपोर्टर्स युनियनच्या वतीने 12 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे युनियनचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितले.

अग्नीवीर होण्याचं पितळ उघड, नगरमध्ये चौघांनी पोलिसांनी घेतलं ताब्यात 

या संघटनेने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 2022-23 या कालावधीत उसाच्या एकरी उत्पादनात घट झाल्याचे साखर आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्याचे गंभीर परिणाम ऊसतोड कामगारांना भोगावे लागत आहेत. दिवसभर राबराब राबूनही उसाचे वजन कमी असल्याने ऊस तोडणाऱ्यांना पूर्ण मंजुरी मिळत नाही, असं क्षिरसागर यांनी सांगितलं.

ऊसतोड कामगार मुकादमांच्या मागण्या काय आहेत?

कोल्हापूर पोलिसांनी नोंदवलेले 150 गुन्हे तात्काळ स्थगित करा

कामगारांना थेट विशेष भत्ता देण्यात यावा

ऊसतोड मजुरांसाठी स्वतंत्र कायदा करावा

मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांची नोंदणी ग्रामपंचायतीमार्फत करावी

ऊसतोड कामगारांची देणी संस्थात्मक कर्जात रूपांतरित करावी

Tags

follow us