agricultural service centers in state called for indefinite strike direct impact on farmers : केंद्र आणि राज्य सरकारने कृषी सेवा केंद्र यांना घालून दिलेल्या विविध नियम आणि अटींच्या पार्श्वभूमीवर आता देशासह राज्यातील कृषी सेवा केंद्रांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 85 हजार कृषी सेवा केंद्रांनी आजपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेईंचाही मृत्यू? मशहद शहरामध्ये लागलेल्या पोस्टर्सने खळबळ
कृषी सेवा केंद्रांच्या या संपाला देशभरातील अनेक राज्यातील कृषी केंद्र चालकांनी पाठिंबा दिला आहे. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास पॉसमशीन सरकारकडे जमा करण्याचा इशारा देखील संघटनेकडून देण्यात आला. माफदा संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद ताराळ यांनी याबाबत जळगाव येथे बोलताना माहिती दिली.
काय आहेत कृषी केंद्र चालकांच्या मागण्या?
दरम्यान या संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनधिकृत एसटीबीटी बियाण्यांच्या विक्री विरोधात खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीला विरोध, तसेच अवैध कीटकनाशके व खते थेट शेतकऱ्यांना एजंट मार्फत विक्री रोखण्याची मागणी, साथी पोर्टलद्वारे बियाणे विक्री सक्तीच्या निर्णयाला तीव्र विरोध, किरकोळ खत विक्रेत्यांवर लादण्यात आलेल्या जाचक नियमांमुळे व्यवसाय करणे कठीण
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारवाढ तात्काळ सुरू करण्याचे सरकारचे कडक निर्देश
कीटकनाशक कंपन्यांकडून एक्सपायरी मटरेल परत न घेण्याच्या धोरणावर नाराजी, या सर्व मागण्यांच्या सरकारने तातडीने विचार करावा. अन्यथा हे आंदोलन आधिक तीव्र करण्याचा इशारा देखील या संघटनेने दिला आहे. दरम्यान कृषी केंद्र चालकांच्या या निर्णयाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. एवढं मात्र नक्की…
