अवकाळीची नुकसान भरपाई महिनाभरात देणार कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा

शिर्डी : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री‌ अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. ‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे नियोजन उल्लेखनीय आहे. केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय […]

Untitled Design (2)

Untitled Design (2)

शिर्डी : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री‌ अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. ‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाचे नियोजन उल्लेखनीय आहे. केवळ १ रुपयांमध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून याचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे केंद्र व राज्यशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपयांचा वैयक्तिक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ‘महापशुधन एक्स्पो 2023 च्या आयोजना मागील भूमिका विशद केली. पशुसंवर्धन विभागाचे राज्याचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी आपल्या मनोगतात जनावरांच्या ‘लम्पी’ आजाराविषयी शासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, ‘महानंदा’चे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे – पाटील, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, अरुण मुंढे, कृषी विभागाचे आयुक्त सुशिलकुमार चव्हाण, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

Radhakrishna Vikhe: दीड कोटी पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य 

यावेळी ‘पशुसंवर्धन दैनंदिनी’, ‘योजनांच्या घडी पुस्तिका’ व ‘सुलभ शेळीपालन’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे‌ यांनी आभार व्यक्त केले. 25 व 26 मार्च2023 रोजी ‘महापशुधन एक्स्पो 2023’ सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला असून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version