नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली आहे. कोकाटे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी ते नाशिकमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी वरील विधान केले आहे. (Agriculture Minister Manikrao Kokate Controversial Statement Over Farmer)
“आम्ही बराकीतून बाहेर पडलो अन्..” महादेव गित्तेची स्टोरी, थेट कारागृह अधीक्षकांकडे तक्रार; काय घडलं?
कर्जमाफीचा प्रश्व विचारला अन्…
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यात गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित एका शेतकऱ्याने कोकाटे यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारलं. ‘अजितदादा बोलले की कर्जमाफी होणार नाही, रेग्यूलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का?’ असं शेतकरी कोकाटे यांना उद्देशून म्हणाला. त्यावेळी त्यांनी पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही, असं कोकाटे यांनी म्हटलंय. तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले.
कर्जमाफी देणार नसाल तर गावबंदी, मनोज जरांगेंनी दिला सरकारला गंभीर इशारा
कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?” असा सवाल करत सरकार शेतकऱ्यांना शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा,” असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं.
सरकार अन् कोकाटे सत्तेच्या मस्तीत
माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या विधानानंतर विरोधकांनी यावरून सरकारला धारेवर धरण्यास सुरूवात केली आहे. सरकार आणि कृषिमंत्री कोकाटे हे दोघेही सत्तेच्या मस्तीत असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर, कोकाटे यांनी नेमकं काय वक्तव्य केलं माहीत नाही पण, शेतकऱ्यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय साममत यांनी म्हटले आहे.