Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी (Agriculture News ) समोर आली आहे. कारण पीकांना ऐन खत देण्याच्या वेळीच खते महागणार आहेत. त्यामुळे एकीकडे पावसाने ओढ दिल्याने अगोदरच पीकं धोक्यात आली आहेत. त्यात आता खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांवर आस्मानी आणि सुल्तानी अशी दोन्ही संकट ओढावली आहे.
खते का महागणार?
खते महागणार आहेत कारण रशियाकडून भारताला डायअमोनियम फॉस्फेटसारख्या (डीएपी) खतांवर देण्यात येणारी सवलत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ही खतं जास्त किंमतीत मिळणार आहेत. त्यामुळे बळीराज्याच्या खिशाला झळ बसणार आहे. दरम्यान रशियन कंपन्यांनी ही सवलत बंद केली आहे. तर दुसरीकडे चीनने देखील खतांची निर्यात कमी केली आहे.
Scoop : हंसल मेहताच्या ‘स्कूप’ बुसानच्या ग्लोबल ओटीटी पुरस्कारांमध्ये दाखल
गेल्या वर्षी रशिया हा भारताला खतं पुरवठा करणारा देश बनला होता. यामध्ये सवलत दिली जात होती मात्र आता या कंपन्यांना बाजारपेठेतील किंमतींप्रमाणे हे खतं विक्री करण्याची भूमिका घेतली आहे. कारण जागतिक स्तरावर खतांच्या किंमती वाढल्याने या कंपन्यांना सबसिडी देताना आर्थिक बार सहन करावा लागेल. त्यामुळे ही सवलत बंद करण्यात येणार आहे.
दरम्यान गेल्या वर्षी म्हणाजे 2022-23 या वर्षात भारताने रशियाकडून 4.35 टन खते आयात केली होती. या आयातीचे प्रमाम 246 टक्क्यांनी वाढले आहे. त्यात आता सवलत देखील बंद झाली आहे. त्यामुळे आयात खर्च वाढणार आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना खतं खरेदी करताना बसणार आहे.