The Vaccine War: कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर आधारित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित

The Vaccine War: कोवॅक्सिन बनवणाऱ्या शात्रज्ञांच्या जीवनावर आधारित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित

The Vaccine War Trailer: ‘द काश्मीर फाइल्स’च्या (The Kashmir Files) घवघवीत यशानंतर गेल्या काही महिन्यापासून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमा ‘द व्हॅक्सिन वॉर’ची (The Vaccine War) घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासून देशात हा सिनेमा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या वादग्रस्त सिनेमे चर्चेत असतात. ‘द काश्मीर फाईल्सनंतर विवेक अग्निहोत्री यांचा ‘द वॅक्सीन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. देशात बनवलेली कोविडची लस आणि त्यामागचा संघर्ष या सिनेमातून बघायला मिळणार आहे. देशामध्ये कोविड काळात कशा प्रकारे वॅक्सिन तयार करण्यात आली आणि त्यामागे असलेली कितीतरी महिलांची मेहनतीची रंजक अशी कहाणी विवेक अग्निहोत्री या सिनेमाच्या माध्यमातून मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.

या सिनेमातील कथा सत्यघटनेवर आधारित आहे. आता या सिनेमाशी निगडीत एक नवी अपडेट समोर आली आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. पल्लवी जोशीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सिनेमाचा ट्रेलर केले आहे. या पोस्टरमध्ये सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक दाखवण्यात आले होते.

Jawan चित्रपटाच्या कमाईत घसरण; ६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

या पोस्टरमध्ये नाना पाटेकर आणि पल्लवी जोशी हे मुख्य भूमिकेत बघायला मिळणार असून त्यांचा फर्स्ट लूक या पोस्टरच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे. सोबतचच सप्तमी गौडा, गिरिजा ओक, रायमा सेन आणि अनुपम खेर यांच्या देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सगळ्या कलाकारांची ओळख या पोस्टरमधून करून दिल्याचे बघायला मिळत आहे. ‘देशातील पहिला बायो-सायन्स सिनेमा’ असं म्हणत पल्लवीने हे पोस्टर शेअर केल्याचे दिसत आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Jawan चित्रपटाच्या कमाईत घसरण; ६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube