Ahilyanagar Farmers Protest for Irrigation Water: अहिल्यानगरच्या नेवासा (Newasa) तालुक्यातील शिंगवे तुकाई (Shingave Tukai) गावचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आज ( 3 सप्टेंबर) शेतकऱ्यांनी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले.
विद्यानंद बापटांना मारहाण म्हणजे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण; रोहित पवार भडकले
संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे. शिंगवे तुकाई परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची मोठी गरज आहे. पाण्याअभावी शेतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असून, अनेकदा दुष्काळसदृश परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये गावाचा समावेश झाल्यास परिसरातील पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होईल, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.
पुण्यात DJ वादाला हिंसक वळण! कॅमेऱ्यासमोर विद्यानंद बापटांना मारहाण; सुप्रिया सुळे संतापल्या
गावाचा वांबोरी चारी योजनेत समावेश व्हावा यासाठी गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांकडून संबंधित विभागाकडे निवेदने देण्यात आली आहेत. अधिकारी आणि प्रशासनाकडे प्रत्यक्ष भेटूनही मागणी मांडण्यात आली. मात्र, त्यानंतरही या प्रश्नावर निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अर्धनग्न उपोषणाचे आंदोलन सुरू करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी शिंगवे तुकाई गावाचा वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये तातडीने समावेश करण्याची मागणी केली. मागणीचा गांभीर्याने विचार करून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
“घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…” विद्यानंद बापटांचा श्लोक व्हायरल; त्यांनीच सांगितला श्लोकचा अर्थ
दरम्यान, प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गरज पडल्यास मुंबईतील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला. वांबोरी चारी टप्पा दोनमध्ये शिंगवे तुकाई गावाचा समावेश झाल्यास परिसरातील दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
