शेतकऱ्यांनी मोर्चा जंतरमंतरकडे वळवला, पोलिसांकडून दिल्लीच्या सर्व सीमा सील, पोलीस बंदोबस्तही तैनात

शेतकऱ्यांनी मोर्चा जंतरमंतरकडे वळवला, पोलिसांकडून दिल्लीच्या सर्व सीमा सील, पोलीस बंदोबस्तही तैनात

Farmers protest: हमीभावासाठी (Base Price) कायदा करावा, या मुख्य मागणीसाठी पंजाब-हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकरी (Farmer) आक्रमक झाले आहेत. जंतरमंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी (Delhi Police) दिल्लीकडे  अन्य राज्यांमधून येणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

‘इतकी वर्ष संधी अन् उपमुख्यमंत्री कोणी केलं’; शरद पवारांसाठी अमोल कोल्हे मैदानात 

पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांनी हरियाणा पोलिसांना रोखले. शेतकरी संघटनांनी ६ मार्च रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर निदर्शनास परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी सांगितलं की, जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली नाही. यावेळी त्यांनी 26 फेब्रुवारीच्या निर्देशाचा हवाला दिला. ज्याच आंदोलकांना जंतरमंतरवर प्रवेश करण्यास मनाई केली होती. मात्र, शेतकरी आक्रमक झालेत.

अर्णब गोस्वामीला मोठा दिलासा, केस मागे घेण्यास कोर्टाची परवानगी 

दरम्यान, आता दिल्लीहून अन्य राज्यांमध्ये जाणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील आंतरराज्य बस स्थानकांवरही पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये, यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

हरियाणा पोलिसांनी मार्ग अडवल्यामुळं इतर राज्यातील शेतकऱ्यांनाही ट्रेन किंवा बसने दिल्ली गाठण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे अनेक शेतकरी रेल्वे आणि बसने दिल्ली गाठत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आंदोलन तीव्र करून त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

30 शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध
केंद्र आणि हरियाणा सरकारने आतापर्यंत 30 शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध केलं आहे. याशिवाय दिल्लीत येणाऱ्या शेतकरी नेत्यांनाही सीमेवर किंवा दिल्लीत आल्यानंतर स्थानबध्द केलं जाईल, असा इशारा दिल्ली पोलिसांनी दिला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube