अर्णब गोस्वामीला मोठा दिलासा, केस मागे घेण्यास कोर्टाची परवानगी
Arnab Goswami : अर्णब गोस्वामीला (Arnab Goswami) मुंबईतील एका न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला आहे. ‘बनावट टीआरपी’ (Fake TRP) प्रकरणातील केस मागे घेण्याची मुंबई पोलिसांची याचिका कोर्टाने स्वीकारली आहे. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीसह काही चॅनल्सवर फसवणूक करून प्रेक्षक संख्या वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता. यात अर्णब गोस्वामीलाही आरोपी करण्यात आले होते.
एस्प्लेनेड कोर्टातील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर दाखल केलेल्या अर्जात फिर्यादीने म्हटले आहे की केस पुढे नेण्यासाठी कोणताही पीडित पुढे आला नाही. त्यामुळे पोलिसांना वाटते यातून कोणीही दोषी ठरणार नाही.
ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (BARC) ने ऑक्टोबर 2020 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात पत्रकार अर्णब गोस्वामीचेही नाव आहे. न्यायालयाने बुधवारी खटला मागे घेण्याची परवानगी दिली आहे.
Pune Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट; संदीपच्या प्रेयसीची कसून चौकशी
मात्र, आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, तपासकर्त्यांना कथित टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (टीआरपी) फेरफारचे पिडीत पुढे येण्याची अपेक्षा होती परंतु फसवणूक वाटणारी एकही व्यक्ती पुढे आली नाही आणि साक्षीदारांनी परस्परविरोधी विधाने केली आहेत.
‘इंडिया’ला मोठा झटका, काँग्रेस केवळ 37 जागा जिंकणार, काय सांगतो 543 जागांचा सर्व्हे?
दरम्यान, काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी टीआरपीच्या आकड्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत BARC ने ऑक्टोबर 2020 मध्ये हंसा रिसर्च ग्रुपच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अर्णब गोस्वामीने सहआरोपी आणि बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी टीआरपीमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पोलिसांनी दाखल केला होता. त्यानुसार पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.
शिंदे गट आणि अजितदादा गटाला सिंगल डिजिट जागा? जागावाटपावर फडणवीस म्हणाले…