Pune Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट; संदीपच्या प्रेयसीची कसून चौकशी

Pune Drugs Case : ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट; संदीपच्या प्रेयसीची कसून चौकशी

Pune Drugs Case : पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) नवा ट्विस्ट समोर आला आहे. ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संदीप धुणेची (Sandip Dhune) प्रेयसी सोनम पंडीतची (Sonam Pandit) पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सोनम पंडितला पुणे पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी आता संदीप धुणेची प्रेयसी सोनम पंडीतचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Ajay Devgan : चार वर्षानंतर सिंघम अभिनेता ‘मैदान’ मारण्यास सज्ज, जाहीर केली रिलीज डेट

या प्रकरणात पुणे पोलिसांना नवीन माहिती समोर आली आहे. संदीप धुणे याने त्याची प्रेयसी सोनम पंडितच्या नावाने काही मोबाईल आणि सिमकार्डस् खरेदी केले असल्याचा संशय पोलिसांकडून बळावण्यात आला आहे. तसेच दोघेही पुण्यातील एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. संदीप धुणे हा ड्रग्ज कारवाईनंतर नेपाळमार्गे कुवेतला पळून गेला असल्याचाही संशय पोलिसांना आहे. आता या प्रकरणात सोनम पंडितने संदीपला कोणत्या बाबतीत मदत केलीयं, का? तिचा काही सहभाग होता? या अॅंगलने पोलिसांकडून तपास सुरु आहे.

आगामी लोकसभेसाठी केसीआर-मायावती घेणार एकमेकांची मदत; बसपा-बीआरएस आघाडीची घोषणा

ड्रग्जचा मास्टरमाईंड संदीप धुनिया आखाती देशांतील कुवैतमध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. पोलिसांनी धुनियाच्या अटकेसाठी सीबीआयची मदत घेतली आहे. तसेच रेड कॉर्नर नोटीसही बजावण्याची तजवीज करण्यात आली आहे. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणांमध्ये सरकारी पक्षांकडून विशेष वकीलांची नेमणूक करुन फास्टट्रॅक कोर्टात हा खटला सुरु आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुण्यात 4000 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी परिसरातून 340 किलो ड्रग्ज जप्त केले. मेफेड्रोनसारखे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. विश्रांतवाडी परिसरातून 80 किलोहून अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. या 80 किलो ड्रग्सची किंमत सुमारे 150 कोटी रुपये आहे. दरम्यान, याबाबत आरोपींची चौकशी केली असताना एका ट्रकमध्ये एमडी ड्रग्स बनवण्यासाठी 340 किलो कच्चा माल असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे छापा टाकून एमडी ड्रग्जचा कच्चा माल जप्त करण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube