मुळशी पॅटर्नच! ‘संदीप’ मोहोळची हत्या अन् ‘शरद’ची गुन्हेगारीत इनकमिंग…

मुळशी पॅटर्नच! ‘संदीप’ मोहोळची हत्या अन् ‘शरद’ची गुन्हेगारीत इनकमिंग…

Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol) गोळ्या झाडून हत्या झालीयं. शरद मोहोळचाच (Sharad Mohol) साथीदार मुन्ना उर्फ संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नच घडल्याचं बोललं जात आहे. शरद मोहोळचीच सध्या राज्यभरात चर्चा असतानाच शरद मोहोळची नेमकी गुन्हेगारी विश्वात इनकमिंग झाली कशी? शरद मोहोळ नेमंका कुठला? गुन्हेगारीत प्रवेश करुन त्याने कशा पायऱ्या चढल्या होत्या? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात…

‘तेव्हा कोल्हे भेकडासारखे पळून गेले होते…’, अजित पवार गटाची अमोल कोल्हेंवर घणाघाती टीका

पुण्यातलं प्रसिद्ध असलेल्या मुळशी गावात शरद मोहोळचा जन्म झाला होता. याच गावात शरद मोहोळचे आई-वडील एक शेतकरी होत. एका सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा उदनिर्वाहासाठी गुंड संदीप मोहोळचा वाहनचालक म्हणून नोकरी करीत असत. शरदची नोकरी सुरु असतानाच 2006 साली मारणे गॅंगने संदीप मोहोळ याची हत्या केली होती. संदीप मोहोळची हत्या ही शरद मोहोळला गुन्हेगारी विश्वात नेण्यात संधीच ठरली. याचदरम्यान, शरदने आपलं गुन्हेगारी क्षेत्रात पाऊलं ठेवलं.

संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायचा हा उद्देश मनात ठेऊन शरद मोहोळने गॅंग चालवण्यास सुरुवात केली. पण या गॅंगवॉरला सुरुवात ही संदीप मोहोळपासूनच झाली होती. संदीप मोहोळने मारणे गॅंगच्या सुधीर रसाळची निर्घूण हत्या केली होती. त्यालाच प्रत्युत्तर मारणे टोळीने संदीप मोहोळला संपवून दिलं होतं. तेव्हापासूनच मारणे गॅंग आणि शरद मोहोळ यांच्यात खुन्नस होती.

Bhumi Pednekar : बॉलिवूड मधून गाजलेल्या अभिनेत्रीनं घेतलाय मोठा निर्णय, ‘आता ओटीटी…’

संदीपच्या हत्येनंतर पुण्यात जणू काही मुंबईसारखंच गॅंगवॉर सुरु झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. संदीप मोहोळ हत्येनंतर सर्व गॅंगची सुत्रे शरदने हाती घेतली. गॅंगची सुत्रे हाती येताच शरदने संदीप मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचं ठरवलं. शरद मोहोळने 2010 साली संदीपच्या हत्येतील म्होरक्या किशोर मारणे याची हत्या केली. या प्रकरणी त्याला कोर्टात जन्मठेपही झाली, पण तो जामिनावर बाहेर आल्याची माहिती वृत्तवाहिन्यांकडून देण्यात आली होती.

मारणे गॅंगला प्रत्युत्तर दिल्यानंतर शरद मोहोळ याचीच सर्वत्र दहशत पसरली. त्यानंतर शरद मोहोळने शहरात खंडणी, अपहरण, हत्यांचं सत्र सुरुच ठेवलं. विविध पोलिस ठाण्यात त्याच्या नावे गुन्ह्यांची नोंद झाली. लवासा सिटी प्रकरणातही त्याचं नाव समोर आलं होतं. लवासा प्रकरणी त्याने दासव्याचे सरपंच शंकर धिंडले यांचं अपहरण केलं होतं. या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली, पण प्रत्येक गुन्ह्यात अटक झाल्यानंतर शरद मोहोळचा एक पाय आत आणि एक बाहेर असाच क्रम सुरु राहिला होता.

सरपंचाचं अपहरण :
लवासा सिटीपासून जवळच असलेल्या दसवे गावचे तत्कालीन सरपंच शंकर धिंडले यांचे शरद मोहोळने अपहरण केलं होतं. अपहरण करुन त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर काही पैसे मोजल्यानंतर मोहोळने सरपंचाची सुटका केली मात्र, पोलिसांनी शरद मोहोळसह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.

कातिल सिद्धीकीला मारुन राष्ट्रभक्त अशी प्रतिमा :
कारागृहात असताना शरद मोहोळ आणि दहशतवादाचा आरोप असलेला कातिल सिद्धिकी याच्यासोबत मोहोळचा वाद झाला. एकमेकांकडे बघण्यावरुन झालेल्या वादाचं रुपांतर शेवटी हत्येत झालं. मोहोळने साथीदाराच्या मदतीने सिद्धीकीची नाडीने गळा आवळून हत्या केली. एका दहशतवाद्याला मारल्यानंतर शरद मोहोळची एक राष्ट्रभक्त असल्याची प्रतिमा समाजासमोर तयार झाली. त्याचाच परिणाम म्हणून अनेक सामाजिक, धार्मिक, संघटना त्याच्या कुटुंबियांना कार्यक्रमांचं निमंत्रण द्यायला लागली. अनेक कार्यक्रमात त्याला मान सन्मान मिळू लागला.

बिनविरोध उपसरपंचपदी निवड :
दसवे गावच्या संरपंचाचं अपहरण केल्याप्रकरणी शरद मोहोळला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. याचवेळी मुठा गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शरद मोहोळ याने बिनविरोध उपसरपंचपद मिळवलं आहे. कारागृहात असताना गावचं उपसरपंचपद मिळवल्याने त्याच्या दहशत किती असेल? याची प्रचिती येते.

पत्नीचा भाजप प्रवेश :
जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळची राजकारणाशी नाळ जुळली. पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने शरद मोहोळसह समर्थकांचं पाठबळ मिळेल, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी लावला होता. तर राजकारणात पत्नीच्या माध्यमातून शरद मोहोळ सक्रिय झाला.

‘मुळशी पॅटर्न’ची पुनरावृत्ती :
2006 ते 2024 असा शरद मोहोळच्या गुन्हेगारीचा कालखंड ठरला आहे. संदीप मोहोळ हत्येनंतर शरद मोहोळच्या गुन्हेगारीचं पर्व सुरु झालं होतं. जसं आपण मुळशी पॅटर्न चित्रपटात पाहिलं अगदी त्याचं पद्धतीने शरद मोहोळचा साथीदार असलेला मुन्ना संतोष पोळेकर याने साथीदारांसह त्याचा गेम केला आहे.

दरम्यान, मोहोळने राजकारणात प्रवेश केला पण भूतकाळ काही त्याची पाठ सोडत नव्हता. अखेर कधीकाळी साथीदार असलेल्या लोकांसोबत व्यवहारातून बिनसलं आणि यातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. पण पुण्यात सुरु झालेलं गॅंगवार काही वर्ष थांबल पण आता शरद मोहोळच्या हत्येनंतर पुन्हा सुरु होणार की थांबणार? हे येणारा काळचं सांगेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube