शरद मोहोळ खून प्रकरण : शेलार गॅंगची एक धमकी गॅंगवारसाठी ठरली ठिणगी..?

शरद मोहोळ खून प्रकरण : शेलार गॅंगची एक धमकी गॅंगवारसाठी ठरली ठिणगी..?

Sharad Mohol : पुण्यातील कोथरुडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची गोळीबारातून खून झाल्याची घटना घडली. काही अज्ञात आरोपींकडून त्याच्यावर भर लग्नाच्या वाढदिवशीच गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जखमी झालेल्या शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी असल्याचं बोलंलं जात आहे. खूनामागच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे 2022 मध्ये घडलेला शेलार-मोहोळ गॅंगवार होयं. 2022 साली शेलार गॅंगची धमकी मोहोळ-शेलार गॅंगवारसाठी ठिणगी ठरली होती.

रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर ईडीचे छापे, आव्हाड म्हणाले, ‘आपलेच घरभेदी सहकारी सामील’

खून, खंडणी, अपहरणाच्या गुन्ह्यात मोठं नाव मिळवल्यानंतर शरद मोहोळची पुण्यात दहशतीचं वलय निर्माण झालं होतं. शरद मोहोळ आपली गॅंगच चालवत असल्याचं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान, 2022 साली मुळशीत विठ्ठल शेलार गॅंगशी मोहोळ गॅंगचा सामना झाला. व्यवसायिक वादातून विठ्ठल शेलारने मोहोळ गॅंगचा सदस्यय सिद्धेश हगवणे याला रिव्हॉलव्हरचा धाक दाखवत धमकी दिली. या धमकीनंतर मोहोळ गॅंगचे सिद्धेश हगवणे, अलोक भालेराव, मल्हारी मसुगडे यांनी शरद मोहोळच्या सांगण्यावरुन राधा चौकात विठ्ठल शेलार गॅंगवर हल्ला चढवला होता.

YS Sharmila : काँग्रेसशी वैर पत्करत भावाला CM केलं होतं; वायएस शर्मिला पडद्यामागच्या ‘किंगमेकर’

त्या दिवशी राधा चौकात दैनंदिन कामासाठी लोकांची वरदळ सुरुच होती. त्याचवेळी विठ्ठल शेलार आणि त्याची गॅंग चौकात होती. त्यावेळी मोहोळ गॅंगच्या सदस्यांकडून शेलार गॅंगवर दगड कुंड्यांची बरसात झाली. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचा विचार न करता मोहोळ गॅंगच्या सदस्यांनी राधा चौकात मोठा राडा घातला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ राधा चौकात धाव घेतली होती पण त्याआधीच दोन्ही गॅंगच्या सदस्यांनी धूम ठोकली होती. या घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास केला मात्र दोन्ही गॅंगची एवढी दहशत की एकही नागरिक त्यांच्याविरोधात बोलण्यास तयार झाला नाही. अखेर पोलिसांनीच तपासाची चक्रे फिरवत पुराव्यांच्या आधारे दोन्ही गॅंगवर गुन्हा दाखल केला होता.

‘आमदार अन् प्रकल्प पळवून स्वत:चाच विकास’, भाजपच्या विकासावर सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका

दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात दोन्ही गॅंगचं चांगलच वरदहस्त वाढलं होतं. कोणीही या गॅंगविरोधा बोलण्यास तयार नसल्याची परिस्थिती या गॅंगवॉरमध्ये पाहायला मिळाली होती. अखेर आज 2024 मध्ये अज्ञातांकडून शरद मोहोळची गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याने पुन्हा गॅंगवॉर होणार असल्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन पोलिस तपास करीत आहेत. अद्याप कोणत्याही गॅंगचा शरद मोहोळ हत्येशी संबंध नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, ही हत्या कोणी घडवून आणलीयं? यासाठी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कसून चौकशी केली जात आहे.

कातिल सिद्धीकीला येरवड्यात संपवलं :
पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून मोहोळची ओळख होती. शरद मोहोळ या टोळीने सरपंचाचा अपहरण करुन खंडणी उकळल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात मोहोळ आणि आलोक भालेराव येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये होते. तुरुंगात असतानाच शरद मोहोळने दहशतवादी कातिल सिद्दीकीची नाडीने गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी त्याच्यावर खूनाचा आरोप ठेवण्यात आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube