कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका

कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका

Pune :  पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2011 साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यासह इतर सात जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि.डी. निंबाळकर यांनी हा निकाल दिला आहे.

2011 साली पौड येथील एका उद्योजकाच्या अपहरणाबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे खंडणी विरोधी पथक आणि पौड पोलिसांनी शरद मोहोळसह इतर जणांवर खंडणी मागणे, अपहरण करणे, मारहाण करणे या कलमांच्या अंतर्गत कारवाई केली होती.

‘देशाला स्वातंत्र्य मिळालं पण… शिंदे गटाच्या नेत्याचा भिडेंना ‘असा’ही पाठिंबा

तब्बल तेरा वर्षानंतर एकाही साक्षीदाराने सरकार पक्षाच्या बाजूने साक्ष न दिल्याने व त्या वेळच्या काही पोलिसांनी जबरदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचे न्यायालयात शपथेवर सांगितले. तसेच शरद मोहोळ व इतरांकडून गुन्ह्यात कोणत्याही प्रकाररची मालमत्तेची जप्ती सिद्ध होऊ शकली नाही.

‘सडक्या बुद्धीजीवींनो मेसेज डिलीट करा’…म्हणून पुण्यातील तरूणीला वाचवणारा लेशपाल संतापला…

दरम्यान, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, कर्नाटक मधील चेन्नास्वामी स्टेडियम येथील बॉम्बस्फोट, दिल्ली येथील बॉम्बस्फोट प्रकरणातील कुख्यात दहशतवादी कातील सिद्धकीच्या हत्येच्या गुन्ह्यातून दोन वर्षांपूर्वी शरद मोहोळची निर्दोष मुक्तता झाली होती.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री चंद्रकांत यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube