‘सडक्या बुद्धीजीवींनो मेसेज डिलीट करा’…म्हणून पुण्यातील तरूणीला वाचवणारा लेशपाल संतापला…

‘सडक्या बुद्धीजीवींनो मेसेज डिलीट करा’…म्हणून पुण्यातील तरूणीला वाचवणारा लेशपाल संतापला…

Attack on MPSC Student : पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची घटना ताजी असताना, मंगळवारी पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दर्शना पवार प्रमाणेच या तरूणीवर देखील एकतर्फी प्रेमातूनच हा हल्ला झाला. मात्र लेशपाल जवळगे या तरूणाने या मुलीला वाचवलं. त्यानंतर आता या तरूणाने इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत आपला संताप व्यक्त केला आहे. मात्र तो का संतापला पाहुयात… ( Attack on MPSC Student in Pune Leshpal Javalage who save girl Aggressive on Peoples)

Adipurush: “रामायण-कुराण यांसारख्या धर्मग्रंथांना तरी सोडा”; कोर्टाने निर्मात्यांना कडक भाषेत झापलं

का संतापला लेशपाल जवळगे?

पुण्यातील सदाशिव पेठेमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरूणीवर हल्ला होत असताना लेशपाल जवळगेने हल्लेखोराला रोखलं. या तरूणीचे प्राण वाचवले. मात्र त्यानंतर लेशपालला अनेकांनी या त्या पीडीत मुलीची आणि हल्लेखोर तरूणाची जात विचारली. त्यामुळे या तरूणीला वाचवणारा लेशपाल इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं.

‘बीसीसीआय’वर शिंदे सरकार मेहरबान; सुरक्षा शुल्कात दिली भरभक्कम सवलत

काय आहे इन्स्टाग्राम स्टोरी?

यामध्ये लेशपाल म्हणाला की, ‘त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती. असं मला मेसेज करून विचारणाऱ्या सडक्या बुद्धीजीवांनो मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता. ना समाजाचे, कीड लागली आहे. तुमच्या वरच्या थोड्याफार राहिलेल्या भागाला.’ अशा शब्दांत त्या पीडीत मुलीची आणि हल्लेखोर तरूणाची जात विचारणाऱ्यांवर या तरूणीला वाचवणारा लेशपाल इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवत चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं.

काय आहे नेमकी घटना?

भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागामध्ये एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर शंतनू जाधव या तरूणाने एकतर्फी प्रेमातून या तरूणीवर हा हल्ला केला. तिने आपल्याशी बोलणं बंद केलं. त्याची तक्रार घरच्यांकडे केली. या रागातून त्याने हा हल्ला केला. सदाशिव पेठ या गजबजलेल्या भागातून ही तरूणी तिच्या दुसऱ्या मित्रासोबत जात होती. यावेळी शंतनूने त्यांना थांबवले. मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरूणी या ठिकाणाहून पळाली. तेव्हा त्याने तिचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती वाचली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube