‘बीसीसीआय’वर शिंदे सरकार मेहरबान; सुरक्षा शुल्कात दिली भरभक्कम सवलत

‘बीसीसीआय’वर शिंदे सरकार मेहरबान; सुरक्षा शुल्कात दिली भरभक्कम सवलत

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयवर (BCCI) शिंदे सरकार (Shinde Government) मेहरबान झाले आहे. वर्ल्डकप सामन्यांपूर्वी राज्य सरकारने बीसीसीआयवर सवलतींचा पाऊस पाडला आहे. क्रिकेट सामन्यांसाठी पुरवाव्या लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्कात सरकारने मोठी कपात केली आहे. गृह खात्याने 2019-2020 ते 2023-24 या कालावधीत क्रिकेट सामन्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे नवीन दर लागू केले आहेत. यामध्ये सलवलत देताना बीसीसीआयवर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. (The state government has made a huge reduction in the charges of police security to be provided for cricket matches)

जुन्या दराप्रमाणे टी-20 सामन्यांसाठी 70 लाखांचे सुरक्षा शुल्क आकारण्यात येत होते. नवीन दराप्रमाणे ते 10 लाख असणार आहे. तर एकदिवसीय सामन्यांसाठी 75 लाख रुपये सुरक्षा शुल्क आकारण्यात येत होते. ते आता 25 लाख असणार आहे. तर कसोटी सामन्यांसाठी 60 लाख शुल्क आकारण्यात येत होते. ते आता केवळ 25 लाखांवर आणण्यात आले आहे. मुंबईप्रमाणे नवी मुंबई, नागपूर, पुणे या शहरांतील मैदानात क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. तिथेही ही सवलत लागू केली आहे, याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.

हॉटेल रुमचे भाडे वाचून डोळे होतील पांढरे; वर्ल्डकपआधीच भारत-पाक सामन्याचा उत्साह शिगेला

2 दिवसांपूर्वीच विश्वचषक सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. यात भारतातील एकूण 10 मैदानांवर हे सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात दोन मैदानांवर सामने खेळवले जाणार आहेत. त्यात मुंबईमधील वानखेडे स्टेडियम आणि पुण्यातील गुहंजे येथील स्टेडिअमवर सामने रंगणार आहेत. या दोन स्टेडिअमवर दहा सामने होणार आहेत. यातील नऊ सामने हे साखळी फेरीमधील आहेत. तर मुंबईमधल्या वानखेडे स्टेडिअमवर उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.

वर्ल्ड कप 2023 शेड्यूल

8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube