Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला असं पोहचलं 140 किलो एमडी ड्रग्ज

Pune Drug Case मध्ये महत्त्वाची अपडेट; कुरकुंभ दिल्ली व्हाया लंडनला असं पोहचलं 140 किलो एमडी ड्रग्ज

Pune Drug Case : राज्यसभरातील विविध ठिकाणी छापेमारी करीत पुणे पोलिसांकडून 3500 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त ( Pune Drug Case ) करण्यात आले होते. या ड्रग्ज प्रकरणामध्ये आता आणखी एक अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये पुण्यातील कुरकुंभ येथे निर्माण करण्यात आलेली ड्रग्ज आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आले आहेत. हे ड्रग्ज विमानाने फूड डिलिव्हरी सर्विसच्या मार्फत पाठवण्यात आलं होतं. दिल्लीतून तब्बल 140 किलो एमडी ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी करण्यात आली होती. या ड्रग्ज ची किंमत साधारणता 280 कोटी रुपये एवढी आहे.

रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू, आरोप सिध्द करा अन्यथा…; मंत्री विखेंचा इशारा

यासाठी दिल्लीत दोन जण अधिकृत फुड्स कुरिअरचा व्यवसाय करत होते त्यांच्या माध्यमातून हे पार्सल पाठवले जात होतं आतापर्यंत दिल्लीतून पुणे पोलिसांनी चार जण नाटक केले आहे यामध्ये दिवेश भुतिया संदीप कुमार संदीप यादव या तीन जणांवर ट्रक लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

अजितदादांसारखी फसवणूक होऊ नये म्हणून सांभाळून राहा; विखेंचा रोहितदादांना खोचक सल्ला

तर पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ट्रक जॅकेट उघड केला आहे. या ड्रग्ज प्रकरणाच्या मास्टरमाईंडचा शोध लावण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. संदीप धुनिया (Sandeep Dhuniya) असं या मास्टरमाईंडचं नाव असून धुनिया आखाती देशांतील कुवैतमध्ये लपल्याची गुप्त माहिती पोलिसांनी मिळाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. पोलिसांनी धुनियाच्या अटकेसाठी सीबीआयची मदत घेतली आहे. तसेच रेड कॉर्नर नोटीसही बजावण्याची तजवीज करण्यात आली आहे.

‘मी’ म्हणजे मराठा समाज, हे डोक्यातून काढा; मंत्री विखेंनी जरांगेंना सुनावलं

दरम्यान ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुणे जिल्ह्यातील कुरकुंभमध्ये मेफेड्रॉनची निर्मिती करणाऱ्या टोळ्या सापडल्या आहेत. त्यांच्याकडून 1688 किलो मेफेड्रॉन अंदाजे 3276 कोटी रुपये किंमत आणि इतर साहित्य जप्त केले आहे. पुणे शहरातील विश्रांतवाडी भागातील एका गोदामातून 55 किलो एमडी जप्त केल्यानंतर पोलिसांनी त्याची लिंक शोधली. त्यात कुरकुंभ येथील ‘अर्थकेम’ कारखान्यातून सहाशे किलोपेक्षा अधिक ‘एमडी’ जप्त करण्यात आले आहे.

पुण्यातून देशभरात एमडीचा पुरवठा होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संबंध समोर येत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीही तपास करत आहेत. यामध्ये वैभव उर्फ पिंटया भारत माने (सोमवार पेठ), अजय आमरनाथ करोसिया (भवानीपेठ), हैदर नुर शेख (विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (डोबिंवली, मुंबई), दिवेश चिरंजीत भुटिया (नवी दिल्ली), संदिप राजपाल कुमार (नवी दिल्ली), संदिप हनुमानसिंग यादव (नवी दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube