अजितदादांसारखी फसवणूक होऊ नये म्हणून सांभाळून राहा; विखेंचा रोहितदादांना खोचक सल्ला

अजितदादांसारखी फसवणूक होऊ नये म्हणून सांभाळून राहा; विखेंचा रोहितदादांना खोचक सल्ला

Radhakrushna Vikhe Patil : अजित पवार (Ajit Pawar) यांची जशी फसवणूक झाली तशी तुमची होऊ नये, म्हणून सांभाळून राहा, असा खोचक सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrusha vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना दिला आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये आयोजित नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते.

धक्कादायक! अकोल्यात शालेय पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात दाखल

राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळे पवार कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले. आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढाई होईल असं बोललं जात आहे. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळीच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केला आहे.

यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आप्पासाहेब पवार आणि विखे कुटुंबाचे जवळचे संबंध होते, आप्पासाहेब हे स्वाभिमानी जगणारे होते. त्यामुळे त्याचा राजकारणावर कुठलाही परिणाम झाला नाही. त्यावेळेस शरदचंद्र पवार सक्रिय राजकारणात होते त्यामुळे कदाचित त्यांचा रोहित पवार यांना इशारा असेल जास्त धावपळ करू नको नाहीतर अजित पवारांसारखी तुमचीही फसवणूक होईल,सांभाळून रहा, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सखोल चौकशी करा : विधानसभा अध्यक्षांचे गृहविभागाला निर्देश

राज्य सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या माध्यमातून नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या नमो महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन आज कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रसाद लोढा व महसूल तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी मेळाव्यास उपस्थित असलेल्या युवकांशी संवाद साधला. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टिने करण्यात येत असलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र सुपूर्त केले. दरम्यान, या मेळाव्यात सहभागी झालेल्या विविध कंपन्यांच्या दालनास देखील भेटी देवून माहिती जाणून घेतली.

याप्रसंगी खासदार सुजय विखे पाटील, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, विठ्ठलराव लंघे, विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube