रोहित पवारांची मागणी, अजितदादांचा ग्रीन सिग्नल; पुण्यातील बैठकीतून ‘कर्जत’ला काय मिळालं?

रोहित पवारांची मागणी, अजितदादांचा ग्रीन सिग्नल; पुण्यातील बैठकीतून ‘कर्जत’ला काय मिळालं?

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुण्यात होते. या बैठकीसाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे याही (Supriya Sule) उपस्थित होत्या. या बैठकीत रोहित पवार यांनी काही महत्वाच्या मागण्या केल्या. यावर दोघांत चर्चा झाली. यानंतर अजित पवार यांनीही मागणी मान्य केली. अजितदादांच्या या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी त्यांचे खास आभार मानले. राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसलेल्या काका-पुतण्याचं हे नव रुप यानिमित्ताने समोर आलं.

कालवा सल्लागार समितीची बैठक पाण्यासंदर्भात होती. या बैठकीत काय निर्णय झाले याची माहिती रोहित पवार यांनी दिली. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले. उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून 1 मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालु्क्यातील 54 गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होईल.

या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्यावतीने आभार! दरम्यान हे आवर्तन 40 दिवसांपेक्षा कमी असणार नाही… अन्यथा सर्व गावांना पाणी पोहोचणार नाही आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल हेही या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. तसंच घोड प्रकल्पातूनही 1 मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवाय भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्य भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना धरणातूनही पाणी सोडण्याचा मुद्दा उपस्थित केला, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.

 कुकडीतून पाणी सोडण्यास राम शिंदेंचा विरोध 

माझ्या मतदार संघात कुकडीचे पाणी येते. ते १ मार्चपासून सोडावे अशी विनंती अजितदादांना केली. ती त्यांनी मान्य केली आहे. उजनीतील पाणी वापरणाऱ्या शेतकऱ्यांना सहा पट पाणीपट्टी दर केला आहे तो कमी करण्यास अजित पवार यांनी सहमती दर्शवली आहे. राजेश टोपे आले होते याची मला माहिती नाही. माझ्या मतदारसंघातील दुसरे आमदार राम शिंदे यांनी कुकडीतून पाणी सोडण्यास विरोध केला आहे, असेही रोहित पवार यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

आज ‘तुतारी’चं लाँचिंग, त्याआधीच राजेश टोपे-अजितदादांची भेट; दोघांत काय खलबतं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube