धक्कादायक! अकोल्यात शालेय पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात दाखल

धक्कादायक! अकोल्यात शालेय पोषण आहारातून 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; रुग्णालयात दाखल

Akola Food Poisoning News : अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी (Akola) समोर आली आहे. अकोला शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणात मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात येत आहे. हा पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत एकूण 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून शाळेच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

या शाळेतील दहा विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या या विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे. अकोला शहरातील महापालिकेच्या शाळेत हा प्रकार घडला. अकोल्याच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी त्यांना खिचडी देण्यात आली होती. या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे. हीच खिचडी विद्यार्थ्यांनी खाल्ली. त्यामुळे त्यांची तब्बेत बिघडली. उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, याआधी बुलढाणा जिल्ह्यातही असाच विषबाधेचा प्रकार समोर आला होता. येथे एका गावात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात ही घटना घडली.

धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज