धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

धक्कादायक! बुलढाण्यात भगर अन् आमटीतून 500 जणांना विषबाधा; काहींची प्रकृती गंभीर

Food Poisoning in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर (Food Poisoning in Buldhana) आली आहे. मंगळवारी जया एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मात्र, याद्वारे जवळपास 500 लोकांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या महाप्रसादात भगर होती. भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या लोकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात ही घटना घडली.

कार्यक्रमानंतर भगर आणि आमटीचा प्रसाद होता. भगर आमटी खाल्ल्यानंतर अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 400 ते 500 जणांना विषबाधा झाली असून या लोकांवर बिबी, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गडचिरोलीत आश्रमाशाळेतील मुलींच्या जीवाशी खेळ; जेवणातून विषबाधा, 73 विद्यार्थी गंभीर

सरकारी दवाखान्यात या लोकांना दाखल करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आल्याने येथील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. जागेचा अभाव, डॉक्टरांची कमतरता अशा समस्या भेडसावत आहेत. रुग्णालयात खाटाही नाहीत. त्यामुळे रुग्णांना जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार करता आले नाहीत. सरकारी दवाखान्यांतील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्रही यानिमित्ताने समोर आले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या नागरिकांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

या कार्यक्रमात प्रसाद खाल्ल्यानंतर अनेकांना त्रास होऊ लागला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाला. त्यानंतर ज्यांना जमेल तसे दवाखाना गाठण्यासाठी धावपळ सुरू झाली. जवळच्या रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकारात अद्याप कुणी दगावल्याची माहिती समोर आलेली नाही.

Thane News : धक्कादायक! आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रुग्णालयात दाखल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज