Thane News : धक्कादायक! आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रुग्णालयात दाखल

Thane News : धक्कादायक! आश्रमशाळेतील 109 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रुग्णालयात दाखल

Thane News : ठाणे जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी (Thane News) समोर आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसई आश्रमशाळेतील 107 मुलांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली. यातील 10 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली असून या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. चार विद्यार्थ्यांव्यतरिक्त उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी विद्यार्थ्यांना मिठाईसहीत जेवण देण्यात आले. जेवणानंतर 109 विद्यार्थ्यांना उलटी आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागला. यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांना तत्काळ सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. विद्यार्थ्यांना जे खाद्य पदार्थ देण्यात आले होते त्यांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. या नमुन्यांची तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Thane Hospital News : शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव 

येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाचे जेवण या आश्रमशाळेतल्या मुलांना देण्यात आले होते. ग्रामस्थांनी ज्यांना जेवण तयार करण्याची ऑर्डर दिली होती त्यांनी जेवण परस्पर बाहेर बनवून घेतलं आणि मुलांना दिलं. जेवण दुपारच्या वेळेला देण्यात आले. या जेवणानंतर मुलांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. सुरुवातील 20 ते 25 विद्यार्थ्यांना उलटी, जुलाब, मळमळ असा त्रास सुरू झाला. या विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या आश्रमशाळेत एकूण 279 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 109 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. त्यामुळे बहुतांश मुले धोक्याच्या बाहेर आली आहेत. चार मुलांची प्रकृती मात्र अजूनही चिंताजनक आहे, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

ठाणे पालिकेत अधिकारी फाईलमागे पाच टक्के मागतायत : आव्हाड लवकरच नाव जाहीर करणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube