गडचिरोलीत आश्रमाशाळेतील मुलींच्या जीवाशी खेळ; जेवणातून विषबाधा, 73 विद्यार्थी गंभीर
Gadchiroli Student Food Poisoned : राज्यात मागील दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशातच आता पुन्हा अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला आहे. शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Student Food Poisoned) झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चाच नाही; फडणवीसांनी घेतला समाचार#DevendraFadnavis #WinterSession #Vidharbha
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) December 20, 2023
माहितीनूसार गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील सोडे इथे शासकीय मुलींची आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत अनेक मुली शिक्षण घेत आहेत. या आश्रमशाळेतील मुलींच्या जेवणाचं कंत्राट देण्यात आलं आहे. मात्र, जेवण तयार करण्यासाठी आश्रमशाळेचेच कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. दुपारच्या सुमारास मुलींसाठी वरण-भात, कोबी-बटाट्याची भाजी बनवण्यात आली होती.
Gauri Khan: गौरी खानला फसवणूक प्रकरणात नोटीस? ईडीने सांगितलं नेमक सत्य काय…
दुपारी सर्व मुलींनी जेवण केल्यानंतर 3 वाजता काही मुलींना उलट्या आणि हगवणचा त्रास जाणवला. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले. त्यानंतर इतर मुलींनाही उलट्या, हगवणचा त्रास झाला. त्यांना सुद्धा रुग्णालयात दाखवणे सुरू झाले.
सायंकाळपर्यंत 105 मुलींना विषबाधा झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जवळजवळ 15 मुलींना उपचारानंतर सुटी देण्यात आली असून 75 विद्यार्थ्यांनींवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, आश्रमशाळेतल्या 105 मुलींना विषबाधा झाली असून त्यातील 15 मुलींची प्रकृती बरी झाल्याने त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, इतर 75 मुलींवर अद्यापही उपचार सुरुच आहे. घडलेल्या प्रकारानंतर गडचिरोलीचे सिव्हिल सर्जन डॉ. खंडाते स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल मीना हे स्वतः रुग्णालयात उपस्थित राहून आढावा घेत आहेत.