अजित पवार लांडग्यांच्या भूमिकेत, बारामतीत ते सायकलवर फिरायचे…; संजय राऊतांचे टीकास्त्र
Sanjay RauT ON Ajit Pawar : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) अनेकदा शरद पवारांवर थेट टीका केली. कधी शरद पवारांचं वय काढलं, तर कधी निवृत्तीचा सल्ला दिला. कालही अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदारांना भावनिक आवाहन केलं जाईल. सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न करतील, अशी टीका अजित पवारांनी केली. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवार लांडग्यांच्या भूमिकेत, बारामतीत ते सायकलवर फिरायचे…; संजय राऊतांचे टीकास्त्र
आज संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार हे इतके निर्दयी होतील, असं मला वाटलं नव्हतं. ज्या शरद पवार साहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं, आपल्याला वाढवलं, प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्याच बाबत तुम्ही अशी विधाने करणे योग्य नाही. या नवीन कळपात गेल्यापासून आपण लांडग्यांच्या भूमिकेत गेलेला आहात. त्यांना मी वाघाची भूमिका म्हणणारच नाही. कारण वाघालाही काळीज असतं. शरद पवार यांच्याशी तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण आज तुम्ही जे आहात, तुम्ही जे सुखाचे चार घास आहात ते पवारांमुळं, असं म्हणत राऊतांनी अजित पवारांवर टीका केली.
Sai Tamhankar: ‘भक्षक’ सिनेमातील पोलीस अधिकारी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
तुम्ही सायकलवर फिरायचे
राऊत पुढं म्हणाले, शरद पवारांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं नसतं तर तुम्ही कुठे असता? अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवरून फिरत असल्याचे आम्ही पाहिले आहे. आज तुम्ही जे काही आहात ते शरद पवारांमुळेच… पण माणसाने इतका कृतघ्न होता कामा नये, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तुमचा उंची ओळखा, शरद पवार कुठे आणि तुम्ही कुठे? अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्यासोबत काम कण्यचाी. शरद पवार हे देशाचे नेते, तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही, अशी टीका आव्हाडांनी केली.