Sai Tamhankar: ‘भक्षक’ सिनेमातील पोलीस अधिकारी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sai Tamhankar: ‘भक्षक’ सिनेमातील पोलीस अधिकारी लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sai Tamhankar: “श्री देवी प्रसन्न”च्या (Shri Devi Prasanna) रिलीजनंतर सई (Sai Tamhankar) पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात सईचा 2024 मधला मराठी चित्रपट रिलीज झाला आणि आता या आठवड्यात सई पुन्हा एकदा नेटफ्लिक्स (Netflix)वरच्या “भक्षक”मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सई “जस्मीत गौर” या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)


या सिनेमात भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar), सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका यात दिसणार आहे. सईने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे आणि आता हा नवा रोल सई कसा साकारणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. भक्षकमध्ये (Bhakshak Movie) भूमी सई ताम्हणकर एका महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार तर आहेच, पण पुन्हा एकदा बॉलिवुड (Bollywood) मधल्या बड्या कलाकारां सोबत ती ओटीटीवर दिसणार आहे.

अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय आणि अत्याचार यामुळे त्यांना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. यावर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. भक्षकच्या ट्रेलर ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि आता 9 फेब्रुवारीला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. सई पहिल्यांदा रेड चिली एंटरटेनमेंट सोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे. आणि यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. वर्षभरात सई नेहमीच वेगवेगळ्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. जस्मीत गौर ला बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Grammy Awards जाहीर! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी उमटवली ग्रॅमीवर मोहोर, संगीतप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव

‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या माध्यमातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी चाहत्यांच्या समोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांच्या फिल्मसाठी चाहते खूप उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या 2 फेब्रुवारीला हा सिनेमा सिनेमागृहात चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

‘श्रीदेवी प्रसन्न’ या फ्रेश सिनेमाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी चाहत्यांपर्यंत आणावी हाच या सिनेमामागचा थॉट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube