Maharashtra Politics : ‘2015 नंतर राष्ट्रवादीत निवडणुकाच नाहीत’; तटकरेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी सुरू (Maharashtra Politics) असून यामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी उलटतपासणीत 2015 नंतर पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत असा दावा केला. 2015 मध्ये राज्य प्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निवडून दिले होते त्यानंतर मात्र पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता (NCP) प्रकरणाची सुनावणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुरू आहे. काल शरद पवार गटातील नेत्यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांची उलटतपासणी घेण्यात आली त्यात त्यांंनी अनेक धक्कादायक खुलासे केले.
Maharashtra Politics : ‘रडीचा डाव खेळू नका, वरच्या कोर्टात जा’ शंभूराज देसाईंचा ठाकरेंना सल्ला
शरद पवार गटाच्या वकिलांनी तटकरे यांची उलटतपासणी घेतली. त्यात काही प्रश्न त्यांना विचारले. या प्रश्नांची उत्तरे तटकरे यांनी दिली. 21 जून रोजी जी बैठक झाली त्या बैठकीचे अध्यक्ष शरद पवार हेच होते. मग अजित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे कधी ठरले? प्रदेशाध्यक्षपदी तटकरे यांची निवड कधी झाली? त्यांना कोणत्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तटकरे यांनी उत्तरे दिली. अजित पवार यांची निवड बहुमताने झाली होती. पक्षात कोणतेही गटतट नाहीत. 2015 मध्ये मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून आलो होतो त्यानंतर पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत असा दावा सुनील तटकरे यांनी केला.
2019 मध्ये ज्यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती होती का, तसेच याला पक्षातील अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा होता का, असाही प्रश्न शरद पवार गटाच्या वकिलांनी विचारला. त्यावर उत्तर देताना तटकरे म्हणाले, या शपथविधीला पक्षनेतृत्वाचा पाठिंबा होता, असे स्पष्टपणे सांगितले.
हे काय! सुनील तटकरे विरोधी बाकांवर; श्रीनिवास पाटलांच्या शेजारी बसून ऐकलं PM मोदींचं भाषण