Pune Drug Case: ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांना अटक, हलगर्जीपणा भोवला

Pune Drug Case: ललित पाटील प्रकरणी दोन पोलिसांना अटक, हलगर्जीपणा भोवला

Lalit Patil Drugs Case : ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालविणाऱ्या ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. या प्रकरणात ड्युटीवर असताना कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे शहर पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 च्या पोलिसांनी अटक केली आहे. नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, ड्रग्स माफिया ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना पळून गेला होता. त्यानंतर मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली.

महाराष्ट्राचा सातबारा काय तुमच्या नावावर आहे का? गावबंदीच्या मुद्द्यावरून भुजबळांचा जरांगेंना सवाल

न्यायालयाच्या परवानगीने ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यात आणले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, त्याच्या नाशिक येथील घराची झडती घेतली असता कोट्यावधी रुपयांचे सोने आढळन होते.

ललित पाटीलने ज्या दिवशी ससून रुग्णालयातून पलायन केले त्या दिवशी ससून रुग्णालयात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव या मुख्यालयातील कोर्ट कंपनीच्या पोलिसांना गुन्हे शाखेच्या युनिट-2 ने अटक केली आहे.

OBC Reservaition : होम मिनिस्टरने माफी मागितली, पोलिसांचं मनोबल खचलं; भुजबळांचा हल्लाबोल

1 ऑक्टोबरला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता त्यावेळी हे दोघेही कैद्यांसाठी 16 नंबर वॉर्ड बाहेर पहारा देत होते. ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या या दोन पोलीस कॉन्स्टेबसह दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube